मुंबई : जून तिमाहीतील प्रमुख कंपन्यांच्या तिमाही आर्थिक निकालांच्या घोषणेपूर्वी गुंतवणूकदारांनी निर्देशांकात सर्वाधिक योगदान देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये नफावसुलीला प्राधान्य दिले. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ घसरण झाली. सुरुवातीच्या उच्चांकावरून माघार घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २७.४३ अंशांनी घसरून ७९,८९७.३४ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरात ८०,१७०.०९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र निर्देशांकातील वजनदार कंपन्यांच्या समभागांमधील विक्रीच्या माऱ्याने त्यांच्या वाढीवर मर्यादा आल्या. दुसरीकडे निफ्टीमध्ये किरकोळ ८.५० अंशांची घसरण झाली आणि तो २४,३१५.९५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> TCS Q1 Results 2024 : टीसीएसला १२,०४० कोटींचा नफा; वार्षिक ८.७ टक्के वाढ

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या सत्रात एका ठरावीक श्रेणीतच व्यवहार करत होते. जूनअखेर पहिल्या तिमाहीतील कमाईच्या हंगामापूर्वी समभागांचे मूल्यांकनाचा प्रश्न पुन्हा पटलावर आला असून, आगामी काळात ते घटण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> ‘पीएलआय’च्या धर्तीवर रोजगारवाढीशी संलग्न प्रोत्साहनपर तरतुदी अर्थसंकल्पात आवश्यक – आयएमसी

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचा समभाग १.४८ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र (१.२४ टक्के), एनटीपीसी (१.१४ टक्के) आणि नेस्ले (१.०५ टक्के), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे, आयटीसीचा १.६४ टक्क्यांनी वधारला. टाटा मोटर्स, एशियन पेंट्स आणि टायटनचे समभागदेखील तेजीसह स्थिरावले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारच्या सत्रात ५८३.९६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ७९,८९७.३४ -२७.४३ (०.०३%)

निफ्टी २४,३१५.९५ -८.५० (०.०३%)

डॉलर ८३.५६ ५

तेल ८५.२६ ०.२१