मुंबई: विक्रमी तेजीनंतर मंगळवारच्या सत्रातही प्रमुख निर्देशांक दिवसअखेरीस किरकोळ घसरणीसह बंद झाले. सत्रातील बहुतांश काळ सकारात्मक पातळीवर राहिलेला सेन्सेक्स सत्राच्या शेवटच्या अर्ध्या तासात नकारात्मक पातळीवर बंद झाला.

जागतिक आणि देशांतर्गत पातळीवरील घडामोडींचे निरीक्षण करत असलेले गुंतवणूकदारांचा सावध पवित्र्याने निर्देशांकांची चाल अडखळल्याचे सलग दुसऱ्या सत्रात अनुभवास आले. मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३.४९ अंशांनी घसरून ७६,४५६.५९ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो ३७०.४५ अंशांनी वधारून ७६,८६०.५३ या उच्चांकापर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये मात्र ५.६५ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो २३,२६४.८५ पातळीवर स्थिरावला. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी शिखर गाठल्यानंतर, नफावसुलीमुळे सत्रअखेरीस ते नकारात्मक पातळीवर विसावले होते.

vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
united cotfab ipo opening for subscription on june 13
युनायटेड कॉटफॅबचा प्रत्येकी ७० रुपयांनी ‘आयपीओ’ गुरुवारपासून
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

हेही वाचा >>> एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पीएफ खात्यातून पैसे कोणाला मिळतात? काढण्याची प्रक्रिया काय आहे? घ्या जाणून….

भांडवली बाजारात तेजीवाल्यांचे पुनरागमन झाले असले तरी बाजार पुढील संकेतांच्या प्रतीक्षेत आहे. नवीन केंद्र सरकारच्या स्थापनेतील अनिश्चिततेच्या निराकरणासह, गुंतवणूकदारांचे लक्ष आता पुढील जागतिक आणि देशांतर्गत घटनांकडे लागले आहे. धोरण सातत्य दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमित शहा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांना त्यांच्या नवीन सरकारमध्ये अनुक्रमे गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार या चार मंत्रालयांचा प्रभारी म्हणून कायम ठेवले आहे. अमेरिकेतील रोख्यांवरील परतावा दर वाढला असून तेथे व्याजदर कपातीबद्दल चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदी सुरू ठेवली आहे. आता अमेरिकी फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ जपान यांच्याकडून विद्यमान आठवड्यात धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. तर देशांतर्गत आघाडीवर किरकोळ महागाईची आकडेवारी बुधवारी जाहीर होणार आहे, त्यावरून रिझर्व्ह बँकेचे पुढील व्याजदर निश्चित होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सरकार स्थापन होताच सोन्याचे बदलले दर, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात घसरण झाली. तर लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, मारुती, एनटीपीसी, महिंद्र अँड महिंद्र आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग वधारले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारच्या सत्रात २,५७२.३८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ७६,४५६.५९ -३३.४९ (-०.०४%)

निफ्टी २३,२६४.८५ ५.६५ ( ०.०२%)

डॉलर ८३.५६ ६

तेल ८१.३७ -०.३२