मुंबई : अदानी समूहावरील लाचखोरीच्या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करीत, गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीच्या जोरावर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी अडीच टक्क्यांहून अधिक उसळी घेत, चालू वर्षात जूननंतरची सर्वाधिक कमाईचा दिवस नोंदवला. परिणामी, सेन्सेक्सने पुन्हा ७९ हजारांची पातळी गाठली, तर निफ्टीनेदेखील २४ हजारांच्या दिशेने मजल मारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,९६१.३२ अंशांनी म्हणजेच २.५४ टक्क्यांनी वधारून ७९,११७.११ पातळीवर स्थिरावला. गेल्या पाच महिन्यांतील निर्देशांकाची एका सत्रातील ही सर्वोत्तम वाढ आहे. दिवसभरात त्याने २,०६२.४ अंशांच्या कमाईसह ७९,२१८.१९ पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५५७.३५ अंशांची वाढ झाली आणि तो २३,९०७.२५ पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये सामील आघाडीच्या सर्व ३० कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीसह, आयटी आणि टेक क्षेत्रातील ‘ब्लू चिप’ कंपन्यांच्या समभागांमधील चौफेर खरेदीने बाजारातील उत्साह वाढला. स्टेट बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, आयटीसी, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.
हेही वाचा >>> बाजाराच्या आकस्मिक मुसंडीमागे, मतदानोत्तर चाचण्यांचा ‘कौल’?
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर कथित लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप अमेरिकेत करण्यात आल्यानंतर गुरुवारच्या सत्रात आपटलेले अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांचे समभाग सावरताना दिसले. यामध्ये अंबुजा सिमेंट्स ३.५० टक्क्यांनी, एसीसी ३.१७ टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायझेस २.१६ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स २.०५ टक्के, अदानी टोटल गॅस १.१८ टक्के आणि एनडीटीव्ही ०.६५ टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा >>> ‘ओला इलेक्ट्रिक’कडून ५०० कर्मचाऱ्यांची कपात
गुरुवारच्या सत्रात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५,३२०.६८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४,२००.१६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.
झोमॅटोचा सेन्सेक्समध्ये समावेश
मुंबई : घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोचे समभाग येत्या २३ डिसेंबरपासून सेन्सेक्समध्ये समाविष्ट केला जाणार आहे. जेएसडब्ल्यू स्टीलला सेन्सेक्समध्ये वगळले जाणार असून त्याजागी झोमॅटोचा समावेश करण्यात येईल, असे मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी निर्देशांकाच्या नियतकालिक पुनर्संतुलनाची घोषणा करताना सांगितले. विद्यमान वर्षात आतापर्यंत झोमॅटोच्या समभागात ११२ टक्के वाढ झाली आहे आणि मागील १२ महिन्यांत १२९ टक्के परतावा दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गुंतवणूकदार ७.३२ लाख कोटींची श्रीमंत
शुक्रवारच्या सत्रात बाजारांनी जोरदार पुनरागमन केल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७९,००० अंशांच्या पुढे झेपावला. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल एका सत्रात ७.३२ लाख कोटी रुपयांनी वाढून ४३२.७१ लाख कोटी रुपयांवर (५.१२ ट्रिलियन डॉलर) पोहोचले आहे. गुरुवारच्या सत्रात गौतम अदानींवरील लाचखोरीच्या आरोपांमुळे एकट्या अदानी समूहातील कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल २.१९ लाख कोटी रुपयांनी घसरले होते.
सेन्सेक्स ७९,११७.११ १,९६१.३२ २.५४%
निफ्टी २३,९०७.२५ ५५७.३५ २.३९%
डॉलर ८४.४४ -६ पैसे
तेल ७४.३७ ०.१९