मुंबई : गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात धातू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये तुफान विक्रीचा मारा केला. याचबरोबर वायदे करार समाप्ती असल्याने त्याचाही नकारात्मक परिणाम प्रमुख निर्देशांकांवर झाला. परिणामी सलग पाचव्या सत्रात निर्देशांकात घसरणीचा क्रम कायम राहिला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१७.३० अंशांनी घसरून ७३,८८५.६० पातळीवर स्थिरावला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा झाल्यामुळे सेन्सेक्सने ७३,६६८.७३ हा सत्रातील नीचांक गाठला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २१६.०५ अंशांनी घसरला आणि तो २२,४८८.६५ पातळीवर बंद झाला.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Maharashtra News Updates in Marathi
Maharashtra News Updates : हिंजवडी आयटी पार्कची कोंडी, महायुती सरकारमधील ‘हे’ मंत्री ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?

हेही वाचा >>> Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी

लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. परिणामी गेल्या पाच सत्रात त्यांनी सावध भूमिका घेत नफावसुलीला प्राधान्य दिले गेल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले आहेत. याचबरोबर जागतिक चलनवाढीमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर कपातीस विलंब होत आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून देखील नजीकच्या काळात व्याजदर कपातीचे संकेत मिळत नसल्याने तेथील रोख्यांचे उत्पन्न वाढले आहे. बरोबरीने १ जून रोजी लोकसभेच्या मतदानोत्तर कौल चाचणीतून अंदाज अपेक्षित असल्याने बाजारावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये, टाटा स्टील, टायटन, टेक महिंद्र, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक आणि कोटक महिंद्र बँकेचे समभाग तेजीत होते.

Story img Loader