Success Story Mukesh Jagtiani : यश कधीच कोणाला सहजनेते मिळत नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. विशेष म्हणजे यशस्वी व्यक्तींच्या मागे त्यांची दिवसरात्र केलेली मेहनत असते. मुकेश जगतियानी यांचीही अशीच गोष्ट आहे, ज्यांनी आपल्या परिश्रम आणि संयमाच्या बळावर श्रीमंत होण्याची किमया साधलीय.

मुकेश जगतियानी शिक्षणासाठी लंडनला गेले, मात्र आर्थिक संकटामुळे त्यांनी उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. यादरम्यान मुकेश यांनी काही काळ टॅक्सी चालवली. त्यानंतर टॅक्सीच्या उत्पन्नातून व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आणि लँडमार्क ग्रुपची स्थापना केली. आज मुकेश हे संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत.

IAS Sreenath, Success Story
Success Story : कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शतकानंतरची वाटचाल!
Shiju Pappen Business Success Story
Success Story: ५००० ची नोकरी करण्यापासून ते आठ कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
two helpline numbers of transport department for complaints against travel companies fare hike is off
दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्सविरोधात तक्रारीसाठीचा क्रमांक बंद…
sky lanterns, heavy rainfall, lanterns, lanterns news,
कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान
100 crore recovery case Sacked police officer Sachin Vaze granted bail
१०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन

हेही वाचाः Artificial Intelligence च्या मदतीने ३२ वर्षांचा मुलगा झाला अब्जाधीश; कमावली ७,८२६ कोटींची संपत्ती

मुकेश जगतियानी यांचे बालपण

मुकेश जगतियानी यांनी लहानपणीच आपले आई-वडील गमावले होते आणि नंतर त्यांच्या भावाच्या मृत्यूने त्यांचे खूप हाल झाले. दरम्यान, घराच्या जबाबदारीमुळे भावाचे दुकान सांभाळण्यासाठी मुकेश यांना १९७३ साली बहारीनला पाठवण्यात आले. तिकडे त्यांनी आपल्या भावाच्या दुकानाचे रूपांतर खेळण्यांच्या दुकानात केले आणि नंतर आणखी ६ दुकाने उघडली.

हेही वाचाः अदाणी फाऊंडेशन मेटाव्हर्सच्या माध्यमातून कौशल्य शिकवणार, विद्यार्थ्यांना मिळणार आभासी अनुभव

लँडमार्क ग्रुप काय करतो?

लँडमार्क ग्रुप अनेक क्षेत्रात काम करतो. आजच्या काळात ते फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि हॉटेल्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे. मुकेशचा बहुतांश व्यवसाय मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये पसरलेला आहे. फोर्ब्सनुसार, आजच्या काळात मुकेश यांची एकूण संपत्ती ५.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ४५ हजार कोटी रुपये आहे. मुकेश जगतियानी यांची पत्नी रेणुका जगतियानी सध्या कंपनी चालवत आहे.