पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया दिवाळखोर फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडच्या (एफईएल) विमा व्यवसायातील हिस्सा खरेदीसाठी यशस्वी बोलीदार म्हणून पुढे आली आहे. यातून बँकेचा आयुर्विमा आणि सामान्य विमा क्षेत्रात प्रवेश होऊ घातला आहे.
फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि फ्युचर जनराली इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील एफईएलच्या श्रेणी १ मालमत्तेच्या विक्रीसाठी राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणापुढे (एनसीएलटी) देणेकऱ्यांच्या समितीने सेंट्रल बँकेला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले आहे.
हेही वाचा >>>‘ओएनडीसी’वरून आता खेळत्या भांडवलासाठी डिजिटल कर्ज
समितीकडून या संदर्भात बँकेला २० ऑगस्ट रोजी पत्र प्राप्त झाले आहे. फ्युचर एंटरप्रायझेसची फ्युचर जनराली इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये २५ टक्के आणि फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्शुरन्समध्ये ३३ टक्के हिस्सेदारी आहे. ही संपूर्ण हिस्सेदारी सेंट्रल बँकेकडून हस्तगत केली जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २० जुलै २०२२ मध्ये, एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने कर्जाखाली दबलेल्या फ्युचर रिटेलविरुद्ध दिवाळखोरी निराकरण कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले.
फ्यूचर समूहाने त्यांचा उद्योग ऑगस्ट २०२० मध्ये २४,७१३ कोटी रुपयांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला विकण्याची घोषणा केली. मात्र त्यावर ॲमेझॉनने आक्षेप प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादाकडे नेले आणि किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील हा समूह आणखीच अडचणीत आला. तथापि पुढे कर्जदात्या समूहाचा पाठिंबा न मिळाल्याने रिलायन्सनेही या संपादन व्यवहारातून माघार घेत, करार रद्दबातल केला.