साखरेच्या वाढत्या किमतीमुळे जगभरातील लोकांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. मागणी आणि पुरवठा यातील प्रचंड तफावत असल्याने साखरेच्या किमतीने १२ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. १९ सप्टेंबर रोजी साखरेची किंमत २७.५ डॉलरपर्यंत वाढली. अशा परिस्थितीत यंदा आतापर्यंत साखरेच्या दरात सुमारे ३० टक्के वाढ झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे साखरेच्या वाढत्या किमतीपासून अमेरिकाही दूर राहिलेली नाही. अमेरिकेतही साखर अजूनही २७ डॉलरच्या आसपास आहे.
भारतातील साखर उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात महागाई वाढली असल्याचे व्यापारी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जवळपास सर्वच देशात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, सणासुदीचा हंगाम लक्षात घेता भारतातील मोदी सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीवर कर लावण्याची तयारी केली आहे. सरकार १३ लाख टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात देऊ शकते.
सरकार साखरेवर सातत्याने लक्ष ठेवते
त्याच वेळी कृषीमंडीचे सहसंस्थापक हेमंत शाह सांगतात की, सरकार गेल्या दोन महिन्यांपासून साखरेवर सातत्याने लक्ष ठेवत आहे. सरकारही वेळोवेळी कारवाई करीत असते. दुर्गापूजा आणि दिवाळी यांसारख्या सणांमध्ये बाजारातील साखरेच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, जेणेकरून दर नियंत्रित राहतील, यासाठीसुद्धा सरकार प्रयत्नशील आहे.
हेही वाचाः गृहकर्ज व्याज अनुदानापोटी केंद्राची ६०,००० कोटींच्या खर्चाची योजना
साखर ४८ टक्क्यांनी महागली
मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळ आणि कमी पावसामुळे भारतासह थायलंडमध्ये साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढत आहेत. तर ब्राझीलमध्ये साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. असे असतानाही आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात साखर ०.२२ टक्क्यांनी महागली आहे. त्याचबरोबर गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात १३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर एका वर्षात ती ४८ टक्क्यांनी महागली आहे.