Google ची मूळ कंपनी Alphabet चे CEO सुंदर पिचाई यांनी २०२२ मध्ये सुमारे १९ अब्ज रुपये कमावले आहेत. स्टॉक अवॉर्ड्सच्या रूपाने त्यांना यातील बहुतेक भाग मिळाला. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये सुंदर पिचाई यांना २२६ मिलियन डॉलर (१८५४ कोटी रुपये) पगार मिळाला आहे. कंपनीत काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याच्या उत्पन्नापेक्षा हे ८०० पट जास्त आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारीमध्ये गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुंदर पिचाई यांना अनेक उत्पादनांचे यशस्वी लॉन्चिंग आणि सीईओ पदावर बढती दिल्याबद्दल ही मोठी रक्कम पगार म्हणून देण्यात आली आहे. त्यांचा पगार जास्त प्रमाणात दिसत आहे कारण, त्यांच्याकडे सुमारे २१८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १७.८८ अब्ज रुपयांचा स्टॉक अवॉर्ड आहे, असंही कंपनीने स्पष्ट केले आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली Google ने त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि YouTube व्यवसायातून नफा कमावला. यावेळी कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. सुंदर पिचाई हे सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आहेत. भारतीय वंशाचे पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले.
हेही वाचाः अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते? खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या
मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना दिला नारळ
गुगलने जानेवारी महिन्यात १२,००० लोकांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचा परिणाम जगभरातील गुगलच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला. याशिवाय गुगल ऑफिसेस खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करीत आहे. छाटणीबाबत सुंदर पिचाई म्हणाले होते की, कंपनीसाठी हा कठीण पण योग्य निर्णय आहे. पुढील रणनीती लक्षात घेऊन हे केले जात असल्याचे ते म्हणाले होते.
हेही वाचाः ५० हजारांत सुरू केलेल्या व्यवसायात कोट्यवधींची कमाई; भरपूर मागणी, जाणून घ्या प्रक्रिया
कर्मचारी कपातीविरोधात संताप
टाळेबंदीच्या विरोधात संताप व्यक्त करत गुगलच्या कर्मचाऱ्यांनी लंडन कार्यालयातून बाहेर पडून राजीनामा दिला. केवळ इंग्लंडमध्येच नाही तर स्वित्झर्लंडमध्येही हेच दिसून आले. तेथेही कंपनीने २०० जणांना कामावरून काढून टाकल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कंपनी सोडली.