भारतातील आघाडीची तंत्रज्ञान आधारित कन्स्ट्रक्शन सोल्यूशन्स कंपनी इन्फ्रा मार्केटने ग्राहकपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेतील आपल्या आगामी इन लाइन ब्रँड IVAS च्या माध्यमातून आपल्या दमदार प्रवेशाची घोषणा केली आहे. एक खास लेबल ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयवासची प्रामुख्याने टाइल्स, सॅनिटरीवेअर, बाथ फिटिंग्ज, इलेक्ट्रिकल्स, मॉड्युलर किचन, फर्निचर आणि डिझायनर हार्डवेअरसह घराच्या नूतनीकरणासाठी लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी खासियत आहे.

आपल्या नानाविध उत्पादनांच्या श्रेणीसाठी उद्योजिका, वेलनेस इन्फ्लुएन्सर आणि एक यशस्वी आई म्हणून ओळख असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिची बँण्ड अँबेसेडर म्हणून इन्फ्रा मार्केटने निवड केली आहे. या माध्यमातून कंपनीने आपल्या ब्रॅण्डच्या प्रतिमेला ग्लॅमर आणि करिश्मा यांचा स्पर्श दिला असून, तो ब्रँडच्या व्यक्तिमत्त्वाशी उत्तम प्रकारे जुळतो.

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actor Siddharth chandekar nickname revealed his mother seema chandekar
सिद्धार्थ चांदेकरचं टोपण नाव माहितीये का? आई सीमा चांदेकरांनी केला खुलासा, म्हणाल्या, “त्याचा जेव्हा जन्म झाला…”
vinay hiremath post (1)
Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!
Purva Kaushik
Video : “शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली…”, ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाली…
Mumbai first box of saffron mangoes of this season will be sold today
आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारात जाणून घ्या, हंगामातील आवक कशी राहणार
actor naseeruddin shah and actress ratna pathak shah in ratnagiri for natya mahotsav
नाट्य महोत्सवासाठी अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत
sweet reaction to first dish made by daughter in viral video is pure joy
लेकीचं कौतुक फक्त बापालाच! पहिल्यांदा मुलीने बनवला स्वयंपाक; वडीलांच्या प्रतिक्रियाने जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video

इन्फ्रा मार्केटचे सहसंस्थापक आदित्य शारदा याप्रसंगी म्हणाले की, गृहसजावटीसाठी IVAS नावीन्यपूर्ण उत्पादनांची व्यापक श्रेणी प्रदान करत वृद्धी साध्य करेल आणि या उत्पादनाच्या प्रकारात सदैव अग्रभागी राहील. तिच्या प्रत्येक पावलातून तिची उच्च शैली आणि आकर्षकता प्रकट करणाऱ्या बहु-प्रतिभावान शिल्पा शेट्टी कुंद्राचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. देदीप्यमान कामगिरीमुळे विश्वास आणि निष्ठा याचे वलय तिला प्राप्त झालेले असून, आयवासद्वारे तेच वलय आम्ही जपण्याचे उद्दिष्ट बाळगतो.

हेही वाचाः विश्लेषण : चांद्रयान ३ मुळे भारतही ‘मून इकॉनॉमी’चा स्पर्धक देश बनणार?

ते पुढे म्हणाले की, आयवास या एका ब्रॅण्डकडून सादर करण्यात आलेली गृहसजावटीची पर्यायांची परिपूर्ण श्रेणी ग्राहकांसाठी उत्पादनांच्या माहितीपूर्ण निवडी वाढवते आणि त्याचबरोबर चिरस्थायी संबंध विकसित करून आपल्या ग्राहकांना आणखी सक्षम बनवते. ग्राहकांच्या आकांक्षांशी एकनिष्ट राहून, तिचा सहयोग ब्रँडची ओळख उंचावते. त्याचबरोबर उत्कृष्टता आणि भव्यता प्रदान करण्याच्या आमचे अतूट समर्पणसुद्धा प्रकट करते.

या नव्या सहयोगाबद्दल बोलताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणतात की, घराच्या अंतर्गत लँडस्केपला प्रेरणा देण्याबरोबरच नवी परिभाषा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि सतत वाढणाऱ्या आयवाससारख्या ब्रॅण्डशी नाते जोडले जात असल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. विज्ञान आणि जीवनशैली यांच्या अनोख्या मिश्रणातून ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार जागा तयार करतानाच डिझाइनच्या योजनांना नव्या उंचीवर नेण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाची मी प्रशंसा करते. केवळ आकांक्षाचा स्वीकारच नव्हे तर नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या ब्रँडचा भाग बनणे खूपच रोमांचक आहे. आयवासचे प्रतिनिधित्व करणे आणि इंफ्रा डॉट मार्केटसारख्या एका अग्रगण्य स्टार्टअपबरोबरच्या या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे.

हेही वाचाः दोन लाखांच्या गुंतवणुकीने सुरुवात अन् आज २ लाख कोटींचे मालक, आता कन्येच्या हाती कंपनीची कमान

टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आऊट ऑफ होम डिस्प्ले आणि इन-स्टोअर आदी माध्यमांतून ही भागीदारी आणि सहकार्य सर्वांसमोर प्रकट होत होईल, जे या भागीदारीतील अभिजातता आणि विश्वासार्हता दर्शवेल. इन्फ्रा मार्केटद्वारे समर्थित IVAS हा संस्कृत शब्द ‘NIVAS’ वरून आलेला आहे आणि घराच्या नूतनीकरणाला तो प्रेरणा देतो. पंखे, लाइट्स, टाइल्स, सॅनिटरीवेअर, बाथ फिटिंग्ज, डिझायनर हार्डवेअर आणि अगदी मॉड्युलर किचन त्याचबरोबर वॉर्डरोब्समधील प्रीमियर प्रकार एकत्र आणून एकप्रकारे तो घर बांधण्याचा भावनिक प्रवासच साजरा करतो. गृह परिवर्तनाच्या या प्रवासात घराला नवीन उंची प्रदान करण्यासाठी आणि सौंदर्याची जोड देण्यासाठी आयवास कटिबद्ध आहे आणि त्यामुळे घर सोयींनी युक्त आणि आनंददायीसुद्दा बनते.

Story img Loader