UPI पेमेंट हे आजकाल अगदी घराघरातच नव्हे, तर मोबाईल-मोबाईलमध्ये सर्रासपणे वापरली जाणारी प्रणाली. करोना काळापासून अगदी हजार पटींनी यूपीआयचा वापर वाढला. आता तर अगदी गल्लीतल्या भाजीवाल्यांपासून ते मॉलमधल्या झगमगीत जगातील शोरूम्सपर्यंत सगळीकडे पैसे चुकवण्यासाठीचे क्यूआर कोड लावलेले असतात. मोबाईलमध्ये यूपीआय पेमेंटचं अॅप उघडायचं, कोड स्कॅन करायचा आणि पासवर्ड टाकला की पेमेंट ‘डन’! पण गेल्या काही दिवसांपासून अशा यूपीआय ट्रान्झॅक्शन्सवर अधिभार लावला जाण्याची चर्चा आहे. तसं झालं, तर काय होईल? याबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष नुकतेच समोर आले आहेत!

बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘लोकलसर्कल्स’ नावाच्या संघटनेनं हा सर्व्हे केला आहे. यानुसार, जवळपास ३८ टक्के ग्राहक त्यांचे ५० टक्के व्यवहार हे डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही माध्यमातून न करता यूपीआय पेमेंटमधून करतात. या सर्वेक्षणामध्ये देशभरातली ३०८ जिल्ह्यांमधून तब्बल ४२ हजार लोकांनी सहभाग घेतला. मात्र, प्रत्येक प्रश्नावर लोकांनी दिलेली उत्तरं वेगवेगळी होती. यूपीआयवरील अधिभाराचा प्रश्न हा इतर प्रश्नांपैकी एक होता, ज्यावर ४२ हजारपैकी १५ हजार ५९८ लोकांनी उत्तर दिलं. १५ जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीत हा सर्व्हे झाला.

सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Chennai Food delivery Boy
Chennai : धक्कादायक! पार्सल देण्यास उशीर झाल्याने महिलेची शिवीगाळ, मन दुखावल्याने फूड डिलीव्हरी बॉयची आत्महत्या
cybercriminals india post fraud marathi news
विश्लेषण: सायबर गुन्हेगारांकडून ‘पोस्टल स्कॅम’चा वापर… काय आहे हा कुरिअर फसवणुकीचा नवा प्रकार?
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
SRA project to be done along Mumbai-Bangalore highway
पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?
Tips for Buying a New Car in marathi
नवीन कार घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तपासणी करणे गरजेचे? PDI टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या A TO Z माहिती
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 

लोकांना UPI पेमेंटवर अधिभार चालेल की नाही?

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या यूपीआय पेमेंटचा वापर करणाऱ्या लोकांपैकी ७५ टक्के लोकांनी असा अधिभार लावल्यास यूपीआय पेमेंट सुविघा वापरणं बंद करणार असल्याचं मत दिलं आहे! विशेष म्हणजे एकूण वापरकर्त्या सहभागी लोकांपैकी फक्त २२ टक्के लोकांनी असा अधिभार लावल्यास हरकत नाही, असं मत दिलं आहे!

German Minister On UPI Payment : “जर्मनीमध्ये हे अशक्य आहे”, भारतातील युपीआय सेवेचं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं कौतुक

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट होण्याचं प्रमाण तब्बल ५७ टक्के इतकं विक्रमी वाढलं आहे. शिवाय, यूपीआयद्वारे पेमेंट होणाऱ्या रकमेचं प्रमाणदेखील ४४ टक्क्यांनी वाढलं आहे. २०२२-२३ मध्ये ८४०० कोटी पेमेंट व्यवहार यूपीआयमार्फत झाले होते. चालू आर्थिक वर्षात ते प्रमाण तब्बल १३ हजार ९०० कोटींपर्यंत गेल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

१० पैकी ४ ग्राहक UPI वापरतात!

या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, जवळपास प्रत्येक १० ग्राहकांपैकी ४ ग्राहक यूपीआय पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे या व्यवहारांवर अधिभार लावण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे लोकलसर्कल्स या सर्वेक्षणाचे निष्कर्ष केंद्रीय अर्थमंत्रालयाला सादर करेल, जेणेकरून यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी कोट्यवधी यूपीआय वापरकर्त्यांच्या मनातील विचार लक्षात घेतला जावा, असं अहवालात म्हटलं आहे.