वृत्तसंस्था , नवी दिल्ली

देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाकडून गुजरातमधील उत्पादन प्रकल्प विकत घेण्यासाठी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला १२ हजार ८४१ कोटी रुपयांचे (१.५४ अब्ज डॉलर) समभाग दिले जाणार आहेत. मारुतीकडून पहिल्यांदाच गुजरातमधील प्रकल्पाचे मूल्य जाहीर करण्यात आले आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

मारुतीने जुलै महिन्यात गुजरातमधील उत्पादन प्रकल्प पालक कंपनीकडून खरेदी करण्याचे जाहीर केले होते. मारुतीकडून सुझुकीला प्रत्येकी १० हजार ४२० रुपये किमतीचे १.२३ कोटी समभाग दिले जाणार आहेत. सोमवारी बाजार बंद होताना असलेल्या समभागाच्या भावात २.७ टक्के सवलतीत ते दिले जातील. या व्यवहारानंतर मारुतीमध्ये सुझुकीचा हिस्सा ५८.१९ टक्क्यांवर जाणार आहे. सध्या तो हिस्सा ५६.४८ टक्के आहे.

हेही वाचा… तीन सरकारी कंपन्यांना केंद्राकडून टाळे ?

सुझुकीने २०१४ पासून उत्पादन प्रकल्पात १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प २०१७ पासून सुरू झाला असून, त्याची ७ लाख ५० हजार मोटारींची वार्षिक उत्पादन क्षमता आहे. उत्पादन प्रकल्प पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर उत्पादनावरील पकड आणखी चांगली होईल, असे मारुतीने म्हटले आहे. याचबरोबर मागणीनुसार उत्पादनात बदल करण्यात कंपनीला मदत होईल.

पहिली ‘ई-एसयूव्ही’ याच प्रकल्पातून

मारुतीकडून पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल गुजरातमधील प्रकल्पात उत्पादित केली जाणार आहे. कंपनीने सहा मॉडेल २०३० पर्यंत बाजारात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही सर्व मॉडेल गुजरातमधील प्रकल्पात उत्पादित केली जाणार आहेत.