नवी दिल्ली : घरोघरी खाद्यपदार्थांचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या स्विगीच्या प्रस्तावित प्रारंभिक समभाग विक्रीचे (आयपीओ) आकारमान वाढवण्यास कंपनीच्या भागधारकांनी गुरुवारी मंजुरी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्विगीच्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत, ‘आयपीओ’च्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या नवीन समभागांच्या विक्रीतून निधी उभारणीचे प्रमाण ३,७५० कोटी रुपयांवरून ५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कंपनीला अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास आकार १,२५० कोटी रुपयांनी वाढवण्याच्या निर्णयालाही भागधारकांनी होकार दिला. मात्र आंशिक समभाग विक्री अर्थात ओएसएसच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या प्रवर्तकांच्या भागभांडवलाच्या विक्रीचे प्रमाण ६,६६४ कोटी रुपये कायम ठेवण्यात आले आहे. कंपनी या माध्यमातून सुमारे ११,६६४ कोटी रुपयांची निधी उभारू इच्छित आहे.

हेही वाचा >>> पाच वर्षांत १ कोटी ‘इंटर्नशिप’ प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट

आर्थिक वर्ष २०२३ मधील ८,२६५ कोटी रुपयांवरून स्विगीचा महसूल आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३६ टक्क्यांनी वाढून ११,२४७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याच कालावधीत कंपनीचा तोटा मात्र ४,१७९ कोटी रुपयांवरून ४४ टक्क्यांनी घसरून २,३५० कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

ह्युंदाईची समभागविक्री विद्यमान महिन्यातच! दक्षिण कोरियाई वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईची भारतातील उपकंपनी ह्युंदाई मोटर इंडियाची महाकाय प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) चालू महिन्यातच, १४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान पार पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत ‘आयपीओ’साठी किंमतपट्टा निश्चित केला जाणे अपेक्षित आहे. ह्युंदाई मोटर इंडिया या माध्यमातून सुमारे २५,००० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. ह्युंदाईचा आयपीओ हा देशातील आजवरचा सर्वात मोठा आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या २१,००० कोटी रुपयांच्या अतिविशाल भागविक्रीलाही तो मात देणारा असेल. या ‘आयपीओ’त नवीन समभागांची विक्री होणार नसून, केवळ आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून सुमारे १४.२१ कोटी समभाग विकले जाणार आहेत.