चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे उतरले असून, भारताने इतिहास रचला आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. संपूर्ण देशाच्या नजरा या ऐतिहासिक मिशनवर खिळल्या होत्या. स्पेसएक्सचे प्रमुख एलोन मस्क यांनीही भारताचे अभिनंदन केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यात इस्रोचे महत्त्वाचे योगदान कधीही विसरता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर हा इतिहास घडवण्यासाठी इस्रोने रात्रंदिवस एक केले आहेत. त्याचबरोबर भारतातील अशा अनेक कंपन्यांचाही यात सहभाग होता, ज्यांनी या मोहिमेत मोलाचे योगदान दिले. भारताचे हे मिशन यशस्वी करण्यात या क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी योगदान दिले आहे. विशेषत: रतन टाटा यांच्या टाटा स्टील आणि भारतातील सर्वात जुने उद्योगपती गोदरेज समूह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे मिशन यशस्वी करण्यात टाटा आणि गोदरेज ग्रुपने कसा हातभार लावला ते जाणून घेऊया.

हेही वाचाः चांद्रयान ३ मोहिमेमुळे मोदी सरकारच्या ‘या’ कंपनीने रचला इतिहास, आता जग होणार अवाक्

टाटा स्टीलचे महत्त्वाचे योगदान

चांद्रयान ३ यशस्वी करण्यात रतन टाटांची कंपनी टाटा स्टीलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा स्टीलने बनवलेल्या क्रेनचा वापर रॉकेटमध्ये करण्यात आला होता. ज्यांनी चंद्राच्या दिशेनं उड्डाण केले होते. लाँचिंगपूर्वीच कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. देशाच्या या मिशनमध्ये टाटांचा उपयोग होऊ शकला याचा त्यांना अभिमान असल्याचे सांगितले होते. टाटा स्टीलने बनवलेले एलव्हीएमथ्री फॅट बॉय लाँच व्हेईकल असेंबल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टाटा स्टीलने जमशेदपूर येथील कारखान्यात बनवले.

हेही वाचाः अदाणी समूहाने ‘या’ सरकारी कंपनीला दिली ४००० कोटींची ऑर्डर, शेअरमध्ये मोठी वाढ

गोदरेज एरोस्पेसने महत्त्वाची भूमिका बजावली

चांद्रयान ३ च्या यशात टाटा स्टील शिवाय भारतातील आणखी एक जुने व्यावसायिक घराणे असलेल्या गोदरेज एरोस्पेसनेदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोदरेज एरोस्पेस या गोदरेज ग्रुपच्या अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने चांद्रयान ३ साठी यान विकास इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स तयार केले. कंपनीने मुंबईजवळील प्लांटमध्ये त्याची निर्मिती केली. इंजिन आणि थ्रस्टर्स व्यतिरिक्त गोदरेज एरोस्पेसने या मिशनसाठी एल११० इंजिन देखील विकसित केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata and godrej played an important role in chandrayaan 3 mission and isro created history vrd
Show comments