टाटा समूहाने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. एका आर्थिक वर्षात १० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवणारा टाटा हा देशातील पहिला ग्रुप ठरला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्रैमासिक आधारावर बोलायचे झाल्यास रतन टाटांच्या जवळची टाटा मोटर्स ही समूहातील सर्व कंपन्यांना मागे टाकत एक लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवून देशातील ८वी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे समूहातील सर्वात मोठी कंपनी TCS चे नावही या यादीत नाही. टाटा समूहाच्या कंपन्यांनी एकूण किती महसूल जमा केला आहे हे आकडेवारीवरून समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

टाटा समूहाने विक्रम केला

टाटा समूहाच्या १४ मुख्य सूचीबद्ध कंपन्यांनी ज्यात टाटा सन्सचे थेट भागभांडवल आहे, त्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १०.०७ ट्रिलियन रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये महसुलाचा हा आकडा ८.७३ ट्रिलियन रुपये होता. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात १५.३ टक्के वाढ झाली आहे. तसे पाहता या कंपन्यांना गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी संयुक्त नफा बघायला मिळाला. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये नफा ६६,६७० कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष २०२२ मधील ७४,५४० कोटी रुपयांपेक्षा १०.६ टक्क्यांनी कमी आहे. याच वर्षी टाटा स्टीलच्या मजबूत कामगिरीमुळे नफ्यात १५६ कोटींची वाढ झाली.

Pune Municipal Corporation , Tax , Elections ,
पुणेकर झाले खूश, यंदा करवाढ नाही!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Youth Congress, officials expelled, Nagpur,
नागपूर : युवक काँग्रेसमध्ये काय चाललंय? आणखी चार पदाधिकारी निष्कासित
Success Story sahil pandita
Success Story : एकेकाळी ५,२०० च्या पगारासाठी बाथरूम स्वच्छतेसह घासली भांडी; पण आता स्वबळावर उभी केली करोडोंची कंपनी
Sebi when listed platform
IPO लिस्ट होण्यापूर्वी करता येणार ट्रेडिंग, सेबी नवीन प्लॅटफॉर्म सुरू करणार? याचा गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
diamond imprest authorisation
केंद्र सरकारची हिरे निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष योजना
Pune Municipal Corporation appointed Yogita Bhosale as Municipal Secretary
महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिवपदी योगिता भोसले; चार वर्षांनंतर पूर्णवेळ नगरसचिव पद

हेही वाचाः २००० रुपयांची नोट आता घरबसल्या बदलता येणार, पण कशी?

टाटा मोटर्सने विक्रम केला

तर दुसरीकडे टाटा मोटर्सनेही विक्रम केला आहे. आतापर्यंत समूहातील कोणतीही कंपनी अगदी TCS देखील हा विक्रम करू शकलेली नाही. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२३च्या चौथ्या तिमाहीत टाटा समूहाचा महसूल १०५,९३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचा महसूल ५९,१६२ कोटी रुपये होता. एका आर्थिक वर्षात १ लाख कोटी रुपयांचा महसूल पार करणारी टाटा मोटर्स ही समूहातील पहिली कंपनी ठरली आहे.

हेही वाचाः ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी का? RBI अन् SBI विरोधात भाजप नेता पोहोचला दिल्ली कोर्टात

टाटा मोटर्स ही देशातील ८वी कंपनी ठरली

टाटा मोटर्स ही १ लाख कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठणारी देशातील ८वी दुसरी कंपनी ठरली आहे. CNBC नुसार, सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, LIC, ONGC, BPCL आणि HPCL या कंपन्यांमध्ये १ लाख कोटींहून अधिक तिमाही महसूल आहे. सध्या टाटा समूहाच्या सर्व लहान-मोठ्या कंपन्यांचा एक युनिट ग्राह्य धरला तरी १२५ अब्ज डॉलरचा महसूल मिळत आहे. यामुळे तो जगातील ६४ वा सर्वात मोठा ग्रुप बनला आहे.

Story img Loader