टाटा समूहाने यूकेमध्ये जागतिक ४० जीडब्लू बॅटरी सेल गिगाफॅक्टरी स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. टाटा समूह या प्रकल्पात चार अब्ज पौंडांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती टाटा ग्रुपने बुधवारी ट्विट करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनीसुद्धा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “समूह आपल्या सर्व व्यवसायांच्या शाश्वत भविष्यासाठी अत्यंत कटिबद्ध आहे. आज मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, टाटा समूह यूकेमध्ये युरोपमधील सर्वात मोठ्या बॅटरी सेल उत्पादन सुविधांपैकी एक सुरू करीत आहे. आमचे अब्जावधी पौंड गुंतवणुकीमुळे देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान येईल, ऑटोमोटिव्ह क्षेत्राला इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये बदलण्यास मदत होईल. यासाठी आमचा स्वतःचा व्यवसाय जग्वार लँड रोव्हर समर्थित आहे.” “या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे टाटा समूहाने तंत्रज्ञान, ग्राहक, पोलाद, रासायनिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमच्या अनेक कंपन्यांसह यूकेशी आपली बांधिलकी आणखी मजबूत करत आहे,” असंही चंद्रशेखरन यांनी सांगितले. मी ब्रिटिश सरकारचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी ही गुंतवणूक सक्षम करण्यासाठी आमच्याबरोबर जवळून काम केले आहे, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले.

हेही वाचाः Money Mantra : Inactive PAN बाबत मोठी अपडेट, अशा पद्धतीनं होणार सक्रिय, जाणून घ्या

ब्रिटीश सरकारनेही दिला दुजोरा, पीएम सुनक म्हणाले…

यूके सरकारने बुधवारी जाहीर केले की, टाटा समूह यूकेमध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) बॅटरी प्लांट किंवा गिगाफॅक्टरी उभारण्यासाठी चार अब्ज पौंडांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे पुरवठा साखळीमध्ये हजारो नोकऱ्या निर्माण होतील. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशाच्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी “अभिमानास्पद” क्षण आणि ब्रिटनच्या कार उत्पादन उद्योगाच्या आणि कुशल कामगारांच्या ताकदीचा दाखला, असे वर्णन केले आहे. टाटा मोटर्सकडे यूके आधारित लक्झरी कार निर्माता जग्वार लँड रोव्हर (JLR) आहे, जी 40 GWh च्या प्रारंभिक उत्पादनासह नवीन गिगाफॅक्टरीचा प्रमुख पुरवठादार असेल. नवीन गिगाफॅक्टरीमध्ये उत्पादन २०२६ मध्ये सुरू होणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या तारखेच्या वाढीबाबत अपडेट; आतापर्यंत २.८ कोटींपेक्षा जास्त ITR दाखल

खरं तर यूकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सुनक यांच्या प्राधान्य क्रमामागील हा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. “यूकेमधील नवीन बॅटरी कारखान्यात टाटा समूहाची अब्जावधी पाऊंडची गुंतवणूक ही आमच्या कार उत्पादन उद्योगाच्या आणि कुशल कामगारांच्या ताकदीचा पुरावा आहे,” असंही सुनक म्हणालेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata group to set up giga factory in britain sunak said its a matter of pride vrd