मुंबईः टाटा मोटर्सने आघाडीच्या मारुतीला पिछाडीवर टाकत बाजार भांडवलानुसार, सर्वात मौल्यवान वाहन निर्माता कंपनी म्हणून मंगळवारी बहुमान मिळविला. टाटा मोटर्स समभागाचे तसेच डीव्हीआर समभागांचे एकत्रित मूल्यांकन मंगळवारी दिवसअखेर ३,१४,६३५.०६ कोटी रुपयांवर चढले. मारुतीच्या ३,१३,०५८.५० कोटी रुपये या मूल्यांकनापेक्षा ते १,५७६.५६ कोटी रुपयांनी अधिक होते.  
 टाटा मोटर्सचे समभाग मूल्य गेल्या काही दिवसांत तेजीत आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजारात २.१९ टक्क्यांनी वाढून ८५९.२५ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात ५.४० टक्क्यांनी वाढून ८८६.३० रुपये अशा ५२ आठवड्यांच्या उच्चांकालाही त्याने गाठले होते. दुसरीकडे टाटा मोटर्स लिमिटेड – डीव्हीआर १.६३ टक्क्यांनी वाढून ५७२.६५ रुपयांवर बंद झाला. मात्र, मारुतीचा समभाग ०.३६ टक्क्यांनी घसरून ९,९५७.२५ रुपयांवर थबकला. मंगळवारच्या पडझडीतही, सेन्सेक्स आणि निफ्टी कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सने सर्वाधिक वाढ नोंदवली. 

हेही वाचा >>> महारेराचे नवीन संकेतस्थळ अंतिम टप्प्यात; फेब्रुवारी अखेर कार्यान्वित होण्याची शक्यता

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
india s industrial production rises 3 1 percent in september
कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

जेएलआरचे मोलाचे योगदान

जग्वार लँड रोव्हर इंडियाने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत २,३५६ मोटारींची विक्री केली असून, टाटा मोटर्सच्या कामगिरीत तिच्या मालकीच्या  जग्वार लँड रोव्हर इंडियाची या कंपनीची आतापर्यंतची उच्चांकी कामगिरीचे सर्वाधिक योगदान राहिले आहे. या कंपनीने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत २,३५६ मोटारींची विक्री केली आहे. टाटा मोटर्सच्या नवीन प्रवासी  वाहनांची, मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कामगिरीही सरलेल्या वर्षभरात लक्षणीय सुधारली आहे.  
कंपनीने मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत १,१९४ मोटारींची विक्री केली होती. तर मागील वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत विक्रीत १०८ टक्के वाढ झाली असून, १,३०८ मोटारींची विक्री झाली आहे. कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत मोटारींच्या विक्रीत १०२ टक्के वाढ नोंदविली होती. याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजन अंबा म्हणाले की, आमच्याकडे मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातून आमच्या नाममुद्रेची बाजारपेठेतील वाढती ताकद समोर आली असून, ग्राहकांच्या मनातही आमची उत्पादने घर करीत आहेत.