मुंबईः टाटा मोटर्सने आघाडीच्या मारुतीला पिछाडीवर टाकत बाजार भांडवलानुसार, सर्वात मौल्यवान वाहन निर्माता कंपनी म्हणून मंगळवारी बहुमान मिळविला. टाटा मोटर्स समभागाचे तसेच डीव्हीआर समभागांचे एकत्रित मूल्यांकन मंगळवारी दिवसअखेर ३,१४,६३५.०६ कोटी रुपयांवर चढले. मारुतीच्या ३,१३,०५८.५० कोटी रुपये या मूल्यांकनापेक्षा ते १,५७६.५६ कोटी रुपयांनी अधिक होते.
टाटा मोटर्सचे समभाग मूल्य गेल्या काही दिवसांत तेजीत आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजारात २.१९ टक्क्यांनी वाढून ८५९.२५ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात ५.४० टक्क्यांनी वाढून ८८६.३० रुपये अशा ५२ आठवड्यांच्या उच्चांकालाही त्याने गाठले होते. दुसरीकडे टाटा मोटर्स लिमिटेड – डीव्हीआर १.६३ टक्क्यांनी वाढून ५७२.६५ रुपयांवर बंद झाला. मात्र, मारुतीचा समभाग ०.३६ टक्क्यांनी घसरून ९,९५७.२५ रुपयांवर थबकला. मंगळवारच्या पडझडीतही, सेन्सेक्स आणि निफ्टी कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सने सर्वाधिक वाढ नोंदवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा