मुंबई: टाटा मोटर्सने तिच्या विद्युत शक्तीवरील अर्थात ई-वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या किमती तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत कमी करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. कंपनीने नेक्सॉन ईव्हीची किंमत ३ लाख रुपयांपर्यंत, पंच ईव्हीची किंमत १.२ लाख रुपये आणि टियागो ईव्हीची किंमत ४०,००० रुपयांनी कमी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त पहिल्या दिवशी दोन पटीने भरणा

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विवेक श्रीवत्स यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मर्यादित कालावधीसाठी लागू राहणाऱ्या या विशेष किमतींसह, कंपनीने ईव्हीच्या किमती पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या जवळ आणल्या आहेत. यातून ई-वाहनांना मुख्य प्रवाहात आणणे आणि मोटार खरेदीचे स्वप्न बाळगणाऱ्यांना स्वमालकीची ई-व्हीच्या खरेदीस प्रोत्साहन मिळावे, असा यामागे उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत गेल्या काही वर्षात वेगाने हिस्सेदारी वाढवण्यासाठी टाटा मोटर्सचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: नव्या पिढीच्या ई-वाहनांच्या कंपनीने दबदबा निर्माण केला आहे. ‘ईव्ही’साठी जाहीर केलेल्या या विशेष किमती याचाच एक भाग आहेत. याआधी, टाटा मोटर्सने पारंपरिक इंधन प्रकारातील टियागो, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी सारख्या मॉडेल्सवर ६५ हजार रुपयांपासून, १.८० लाख रुपयांपर्यंत किमतीत कपात जाहीर केली आहे.