Tata Motors Share Price : गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहाच्या कंपन्यांचे शेअर चांगलेच वाढत आहेत. टाटा मोटर्सच्या शेअर्सने काल बाजारात त्यांचा ८ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता या कंपनीच्या शेअरने नवा उच्चांक गाठला आहे. काल बाजार बंद होताना कंपनीचे शेअर्स NSE वर ३.६८ टक्क्यांनी वाढून ६२१.५० रुपयांवर बंद झाले. त्या शेअर्सने आता आपला सार्वकालिक उच्चांक ओलांडला आहे. यापूर्वी ३ फेब्रुवारी २०१५ रोजी कंपनीने हा विक्रम केला होता. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने जग्वार-लँड रोव्हरच्या विक्रीत वाढ नोंदवली गेली. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जग्वार-लँड रोव्हरची विक्री वाढली

टाटा मोटर्सची जग्वार-लँड रोव्हर विक्री आता तेजीत आहे. ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ९३,२५३ युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या किरकोळ विक्रीत २९ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली. या वर्षी जून तिमाहीत कंपनीने १०१,९९४ युनिट्सपर्यंत विक्री केली आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुम्हाला Flipkartवरून अवघ्या ३० सेकंदांत मिळणार ५ लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

परदेशी बाजारातही विक्री वाढली

परदेशी बाजारपेठेतही कंपनीच्या वाहनांची विक्री वाढली आहे. आता ते ८३ टक्क्यांहून अधिक नोंदवले गेले आहे. उत्तर अमेरिकेत ४२ टक्के आणि चीनमध्ये ६ टक्के वाढ झाली आहे. युरोपच्या बाजारपेठेत कंपनीची विक्री स्थिर राहिली.

हेही वाचाः रशियातील बड्या कंपनीच्या संचालक मंडळावर भारतीयाची नेमणूक

टायटनचे शेअर्सही वाढले

टाटा समूहाच्या टायटन शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. आता त्याचा स्टॉक ३२११.१० रुपयांवर पोहोचला आहे. त्याने ५२ आठवड्यांचा विक्रम मोडला आहे. कंपनीच्या वार्षिक विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या व्यवसायात दुहेरी अंकी वाढ नोंदवण्यात आली आहे. या वर्षी जून तिमाहीत कंपनीने ६८ नवीन स्टोअर्स उघडली आहेत. आता देशातील टायटन स्टोअर्सची संख्या २,७७८ वर गेली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors share breaks 8 year record jlr tremendous sales set a new record vrd
Show comments