पीटीआय, नवी दिल्ली
वाहननिर्मिती क्षेत्रातील टाटा मोटर्सने वाणिज्य वापराच्या वाहनांच्या किंमतीत २ टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. येत्या १ जुलैपासून वाणिज्य वाहनांच्या प्रकार आणि श्रेणीनुसार किंमतवाढ होणार आहे. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा मोटर्स ही भारतातील ट्रक आणि बससह वाणिज्य वाहनांची आघाडीची निर्माता आहे. कंपनीकडून २०२४ सालात केली गेलेली ही तिसरी किंमतवाढ आहे. १ जानेवारीला किमतीत साधारण ३ टक्क्यांची, तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला १ एप्रिलला देखील वाढत्या उत्पादन खर्चाची भरपाई करण्यासाठी २ टक्क्यांपर्यंत किमतीत वाढ कंपनीने केली आहे. वाहन निर्मितीसाठी आवश्यक सुट्या घटकांच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. शिवाय निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किंमती वाढविणे भाग ठरले. मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : ‘सेन्सेक्स’ची ७८ हजाराच्या दिशेने चाल

स्वतंत्र वाणिज्य वाहने व्यवसाय

टाटा मोटर्स लिमिटेडने तिची प्रवासी वाहने आणि वाणिज्य वाहने व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय आधीच जाहीर केला. शिवाय या दोन्ही कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध असतील. म्हणजेच विद्यमान टाटा मोटर्सचे दोन भाग होऊन दोन स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात येतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata s commercial vehicles will be expensive by 2 percent print eco news css
Show comments