वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टाटा समूहातील विविध कंपन्यांचे नियंत्रण असणारी सूत्रधार कंपनी टाटा सन्सने २०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड केल्यावर आपले बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून नोंदणी प्रमाणपत्रही स्वेच्छेने रिझर्व्ह बँकेच्या स्वाधीन केले असून, हा निर्णय टाटा सन्सला तिचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध करावे लागण्यापासून टाळण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून घेतला गेल्याचे सूचित केले जात आहे.

टाटा सन्सच्या दायित्वांमध्ये २०,३०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीनंतर लक्षणीय घट संभवते. उर्वरित दायित्वांची पूर्तता करण्यासाठी, टाटा सन्सने स्टेट बँकेत ४०५ कोटी रुपयांच्या ठेवींची तरतूद केली आहे आणि त्या बदल्यात नोंदणी प्रमाणपत्राच्या प्रत्यार्पणाचा भाग म्हणून रिझर्व्ह बँकेला हमीपत्रही दिले आहे. उपलब्ध अहवालाप्रमाणे, ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीवर २०,६४२ कोटी रुपयांचे निव्वळ कर्ज होते.

maharashtra Mahayuti Govt schemes
Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
jayant Patil, wealth, assembly election 2024
जयंत पाटील यांच्या संपत्तीत ३३ लाखांची वाढ
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
maharashtra government to regularize land transactions which violated fragmentation of land law
विश्लेषण : तुकडेबंदी व्यवहारांचे भविष्य काय?
rbi bans four micro finance from issuing loans
अग्रलेख : ‘मायक्रो’चे मृगजळ!
GST tax of Rs 561 crore has evaded by submitting documents in name of fake company
बनावट कागदपत्रांद्वारे ५६१ कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी- जीएसटी पुणे कार्यालयाकडून हैद्राबादमधील एकास अटक

हेही वाचा : Keven Parekh : Apple च्या CFO पदी नियुक्ती झालेले केवन पारेख कोण आहेत? भारतीय वंशाच्या माणसावर मोठी जबाबदारी

रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सला बँकेतर वित्तीय कंपनी – उच्च स्तर (एनबीएफसी – अप्पर लेयर) म्हणून सप्टेंबर २०२२ मध्ये वर्गीकृत केले. या वर्गीकरणाअंतर्गत कंपन्यांना तीन वर्षांच्या आत भांडवली बाजारात सूचीबद्धता आवश्यक ठरते. तथापि, भरीव कर्ज परतफेडीसह, टाटा सन्सने प्रवर्तकांचे जोखीमांकन देखील लक्षणीयरीत्या कमी केले आहे. शिवाय कंपनीनेच स्वेच्छेने एनबीएफसी म्हणून नोंदणी त्यागली आहे. तरी यातून आता अनिवार्य सूचिबद्धतेची अट शिथिल केली जाईल काय, हा औत्सुक्याचा मुद्दा आहे.

रिझर्व्ह बँकेने श्रेणी-आधारित नियमन (एसबीआर) दिशानिर्देशांचा अवलंब देशातील प्रमुख बँकेतर वित्तीय कंपनी आयएल अँड एफएसच्या पतनानंतर केला. बँकेतर वित्तीय कंपन्यांतील कारभार सुशासित राहील आणि जोखीम कमी करण्यासाठी ‘एसबीआर’ ही एक महत्त्वाची पायरी होती. या नियामक चौकटीतून मग एनबीएफसींचे स्तरीय वर्गीकरण आणि उत्तरदायीत्व सुनिश्चित करण्यासाठी उच्च स्तरातील एनबीएफसींना बाजार सूचिबद्धता अनिवार्य करण्यात आली.

हेही वाचा : Gold-Silver Price: घसरणीनंतर सोने एकदम सुसाट, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत आता…

सक्तीच्या सूचिबद्धतेच्या वृत्तानंतर टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांचे भाव मधल्या काळात लक्षणीय वाढले होते. टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील या कंपन्यांतील गुंतवणूकदारांनी या भाव तेजीतून चांगला फायदाही कमावला. टाटा सन्सचा ‘आयपीओ’ आला तर विद्यमान भागधारकांसाठी ते लाभदायी ठरेल, अशी यामागे अटकळ होती. तथापि, सूचिबद्धता टाळण्याच्या आणि नियमांमध्ये शिथिलतेची विनंती करण्याच्या टाटा सन्सच्या निर्णयामुळे या कंपन्यांच्या समभागांच्या किमती घसरल्या आहेत. टाटा सन्सने अथवा रिझर्व्ह अधिकृतपणे या संबंधाने अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

तर सप्टेंबर २०२५ पर्यंत सूचिबद्धता अटळ

बजाज हाऊसिंग फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स आणि एल अँड टी फायनान्ससह इतर सर्व उच्चस्तरीय बँकेतर वित्तीय कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेद्वारे निर्धारित केलेल्या सूचिबद्धतेच्या नियमांचे पालन केले आहे. टाटा सन्सला जर नियमांत शिथिलता देऊ केली तर या कंपन्यांची ती सापत्न वर्तणूक ठरेल. भारताच्या भांडवली बाजाराच्या सर्वांना समतल वाव असण्याच्या संकेताबाबत, तसेच नियामकांच्या विश्वासार्हतेबाबतही यातून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतील. त्यामुळे तूर्त तरी टाटा सन्सला तिचे समभाग सप्टेंबर २०२५ पर्यंत बाजारात सूचिबद्ध कऱणे अटळ दिसत आहे.