नवी दिल्ली : येत्या ३१ मेपर्यंत आधार आणि पॅनची जोडणी केलेली नसली दुप्पट उद्गम कर (टीडीएस) आकारणीतून करदात्यांना दिलासा मिळेल, असे प्राप्तिकर विभागाने बुधवारी एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. प्राप्तिकर नियमांनुसार, जर पॅन क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी जोडलेला नसेल, तर लागू दराच्या दुप्पट दराने उद्गम कर कापला जाणे आवश्यक आहे. करदात्यांना टीडीएस/टीसीएसच्या ‘शॉर्ट-डिडक्शन/कलेक्शन’मध्ये कसूर झाल्याचे सूचित करणाऱ्या नोटिसा प्राप्त झाल्याच्या तक्रारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) आल्या आहेत. त्यावर मंडळाने स्पष्टीकरणात सांगितले की, ३१ मार्च २०२४ पर्यंत झालेल्या व्यवहारांसाठी आणि ३१ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पॅन- आधार जोडणी झाल्यास करदात्यांवर उच्च दराने कोणतेही कराचा भार येणार नाही.
दुप्पट उद्गम कर-भार ३१ मेपर्यंत शिथिल
प्राप्तिकर नियमांनुसार, जर पॅन क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी जोडलेला नसेल, तर लागू दराच्या दुप्पट दराने उद्गम कर कापला जाणे आवश्यक आहे.
First published on: 24-04-2024 at 21:49 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxpayers who have not linked aadhaar and pan till may 31 will get relief tds print eco news zws