मुंबई : टाटा समूहातील अग्रणी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसचा मार्च ते जून या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ८.७ टक्के वाढीसह १२,०४० कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षी जून २०२३ या तिमाहीत कंपनीने ११,०७४ कोटी रुपये नफा मिळवला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जून तिमाहीत कंपनीचा महसूल ५.४ टक्क्यांनी वाढून ६२,६१३ कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र गेल्या तिमाहीच्या म्हणजेच मार्च तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफा ३.१ टक्क्यांनी घसरला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस नवीन कार्यादेश, विविध उत्पादनांसह उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये कंपनीची चमकदार कामगिरी राहिली.
हेही वाचा >>> ‘पीएलआय’च्या धर्तीवर रोजगारवाढीशी संलग्न प्रोत्साहनपर तरतुदी अर्थसंकल्पात आवश्यक – आयएमसी
कंपनीचे तिच्या ग्राहकांशी संबंध विस्तारत असून, उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कंपनी नवीन क्षमता निर्माण करत आहे. कृत्रिम प्रज्ञा-केंद्रित (एआय) तंत्रज्ञानासह फ्रान्समध्ये टीसीएस पेसपोर्ट, अमेरिकेत आयओटी लॅब आणि लॅटिन अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये वितरण केंद्रांचा विस्तार करत आहे. आव्हानात्मक वातावरणातही संशोधन आणि नवकल्पना यांमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर कंपनी टिकून राहिली. आगामी काळातदेखील वाढीच्या संधी साधण्यासाठी कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर राहील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के कृतीवासन म्हणाले.
हेही वाचा >>> तीन वर्षांत १,००० कोटींच्या महसुली टप्पा गाठण्याचा ‘द स्लीप कंपनी’चे लक्ष्य
दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात टीसीएसचा समभाग ०.३७ टक्क्यांनी वधारून ३,९२३.७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजार भावानुसार, कंपनीचे १४.१९ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.
१० रुपये लाभांश जाहीर
कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग १० रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भागधारकांची पात्रता ठरवणारी ७ जुलै ही ‘रेकॉर्ड तारीख’ जाहीर करण्यात आली असून ५ ऑगस्ट रोजी भागधारकांना लाभांश प्राप्त होईल.
कर्मचारी संख्येत वाढ
टीसीएसच्या कर्मचारी संख्येत सरलेल्या तिमाहीत म्हणजेच मार्च ते जूनमध्ये ५,४५२ ने वाढ झाली आहे. जून २०२४ अखेर कंपनीमध्ये एकूण ६,०६,९९८ लाख कमर्चारी कार्यरत असून १५२ देशांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे. ॲट्रिशन रेट अर्थात कर्मचारी गळतीचे प्रमाण १२.१ टक्क्यांवर घसरले आहे. ॲक्सेंच्युअरनंतर कर्मचारी संख्येत वाढ दर्शवणारी टीसीएस ही दुसरी कंपनी आहे.