Tata Groupच्या तेजस नेटवर्कला 4G/5G उपकरणांसाठी ७४९२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने ही ऑर्डर दिली आहे. BSNL ने संपूर्ण भारतातील 4G/5G नेटवर्कसाठी रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) उपकरणांचा पुरवठा, समर्थन आणि वार्षिक देखभाल सेवांसाठी TCS बरोबर करार केला आहे, अशी माहिती तेजस नेटवर्क्सने दिली आहे. या अंतर्गत आम्ही देशभरातील १ लाख साइट्सना उपकरणे पुरवणार असून, जे कॅलेंडर वर्ष २०२३-२४ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार आहे, असंही कंपनीचं म्हणणं आहे.
कंपनी ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा प्रदान करते
Tejas Networks ७५ हून अधिक देशांमध्ये दूरसंचार सेवा पुरवत असून, सेवा प्रदाते, इंटरनेट सेवा प्रदाते, सुरक्षा आणि सरकारी संस्थांसाठी वायरलेस नेटवर्किंग उत्पादने तयार करते.
हेही वाचाः IT क्षेत्रात बेरोजगारीची लाट! ७ महिन्यांत २.२६ लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
नेमका ऑर्डरचा तपशील काय आहे?
तेजस नेटवर्क्सने BSNL च्या संपूर्ण भारतातील 4G/5G नेटवर्कसाठी रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) उपकरणांच्या पुरवठा, समर्थन आणि वार्षिक देखभाल सेवांसाठी TCS बरोबर करार केला आहे. ही ७४९२ कोटी रुपयांची (सुमारे ९०० दशलक्ष डॉलर) खरेदी ऑर्डर आहे. या अंतर्गत तेजस १००००० साइट्ससाठी उपकरणे पुरवणार आहे, जी कॅलेंडर वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये पूर्ण केली जाणार आहे. Tejas Networks ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये दूरसंचार सेवा प्रदाते, इंटरनेट सेवा प्रदाते, संरक्षण आणि सरकारी संस्थांसाठी वायरलेस नेटवर्किंग उत्पादने तयार करते. तेजसचे बहुसंख्य भागधारक हे टाटा सन्सची उपकंपनी Panatone Finvest आहे.
तेजस नेटवर्कचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी वाढले
तेजस नेटवर्कच्या शेअरमध्ये आज सुमारे ५ टक्के वाढ होत आहे. काल शेअर ३५ रुपयांच्या वाढीसह ८४५ रुपयांवर व्यवहार करीत होता.
जून तिमाहीत कंपनीला २७ कोटींचा तोटा
तेजस नेटवर्कला आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) २७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीला वर्षभरापूर्वी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६.३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला ११.५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.