मुंबई :माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील क्रमांक एकची कंपनी – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) एप्रिल ते जून या तिमाहीत ११,०७४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे बुधवारी जाहीर केले. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९,४७८ कोटी रुपयांचा नफा झाला होता, त्यात यंदा १६.८ टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> सेन्सेक्समध्ये २२४ अंशांची घसरण

ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

टीसीएसने नवीन कार्यादेशांमध्ये वाढ नोंदविल्याने नफ्यात वाढ साधली आहे. असे असले तरी मार्चअखेर संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २.७ टक्के घट झाली आहे. जूनअखेर तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक तुलनेत १२.५ टक्क्यांनी वाढून, ५९,३८१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल ५२,७५८ कोटी रुपये होता. कंपनीने एक रुपया दर्शनी किंमत असलेल्या प्रत्येक समभागासाठी ९ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

हेही वाचा >>> आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना ७,५३२ कोटी रुपये निधी जारी

जागतिक पातळीवर मंदीचे वारे आहे. त्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नजीकचा काळ अस्थिरतेचा राहण्याची चिन्हे आहेत. या परिस्थितीतही टीसीएसने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीकडील एकूण कार्यादेश आता १०.२ अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. कंपनीने ५२३ कर्मचाऱ्यांची भरती केली असून, जूनअखेरीस एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख १५ हजारांवर पोहोचली आहे. कंपनीतून कर्मचारी बाहेर पडण्याचा दर १७.८ टक्के नोंदण्यात आला आहे.

एप्रिलपासून पगारवाढ लागू

टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून उत्साह आणणारे एक पाऊल उचलेले असून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजेच सरलेल्या १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर केली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ आणि त्यातील काहींना पदोन्नती देखील जाहीर करून, तिने पदोन्नतीचे चक्रही सुरू केले आहे. मात्र या वेतनवाढीमुळे कंपनीच्या कमाईवरही परिणाम होणार आहे.

आमच्या सेवांसाठी दीर्घकालीन मागणी चांगली राहील, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा विकसनामुळे ही मागणी वाढत आहे. – के. कृतिवासन, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक, टीसीएस