TCS Recruitment Scam : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे. नुकताच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे कंपनीने आपल्या १६ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, तर ६ वेंडर्सवर बंदी घातली आहे. कंपनीने रविवारी या कारवाईची माहिती दिली.

एकूण १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई

टाटा ग्रुपच्या आयटी कंपनीने रविवारी संध्याकाळी उशिरा या कारवाईबाबत निवेदन जारी केले. कंपनीने सांगितले की, भरती घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान कंपनीचे १९ कर्मचारी भरती घोटाळ्यात सामील असल्याचे आढळले. त्यापैकी १६ कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले, तर ३ कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट युनिटमधून काढून टाकण्यात आले.

kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
tirupati laddu row
Tirupati Laddu Row : “माशांच्या तेलाची किंमत…”; तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण!
“मीसुद्धा २० तास काम करायचो”, ईवाय कंपनीतील तरुणीच्या मृत्यूनंतर इतर कंपन्यांमधील माजी कर्मचाऱ्यांनी सांगितला अनुभव!
supreme court telecom companies marathi news
दूरसंचार कंपन्यांना थकीत देणींबाबत दिलासा नाहीच!
Flight Attedent
Delta Airline : “योग्य अंतर्वस्त्रे परिधान करा”, फ्लाईट अटेंडंटना विमान कंपनीकडून तंबी!
adani group shares drop after hindenburg claim adani swiss bank accounts freeze
स्विस बँक खाती गोठवल्याचा ‘हिंडेनबर्ग’चा आरोप ; अदानी समभागांना झळ

वेंडर्स आणि त्यांच्या मालकांवर कारवाई

टीसीएसने कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काही वेंडर्सवरही कारवाई केली आहे. कंपनीने ६ वेंडर्स, त्यांचे मालक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना TCS बरोबर कोणताही व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. खरं तर जेव्हा भरती घोटाळ्याची माहिती समोर आली, तेव्हा टीसीएसचे काही वेंडर्स त्यांच्या काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून नोकऱ्यांमध्ये हेराफेरी करत असल्याचे उघड झाले होते.

हेही वाचाः Money Mantra : SIP मधील छोटीशी गुंतवणूक नशीब बदलणार; ५०००, ८००० अन् १०००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीत करोडपती होता येणार 

ही बाब जून २०२३ मध्ये उघडकीस आली

के कृतिवासन यांनी नुकतीच टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या अनियमिततेचा आरोप समोर आला आहे. सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच त्यांना हे मोठे आव्हान पेलावे लागले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीसीएसने कडक भूमिका घेतली होती. ही बाब जून 2023 मध्ये उघडकीस आली आणि त्याचवेळी कंपनीने तपास सुरू केला.

हेही वाचाः Money Mantra : नवे घर घेण्याचा विचार करताय? ‘या’ ८ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या अन्यथा…

सुमारे ४ महिने तपास चालला

तब्बल ४ महिने चाललेल्या तपासानंतर टीसीएसने आता कारवाई केली आहे. तपासात कोणत्याही प्रमुख व्यवस्थापकाचा सहभाग उघड झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही कंपनीशी फसवणुकीची बाब नाही. या भरती घोटाळ्यामुळे कंपनीवर कोणतेही आर्थिक दायित्व आलेले नाही. आगामी काळात कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काम करणार असल्याचे TCS ने सांगितले.