टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ची मोदी सरकारद्वारे एक धोरणात्मक भागीदार (Strategic partner) म्हणून निवड करण्यात आली आहे, जी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) ला पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशकतेसह अत्याधुनिक सार्वजनिक खरेदी प्लॅटफॉर्ममध्ये बदलण्यास कटिबद्ध असणार आहे. टीसीएस कंपनीने मंगळवारी एक्सचेंज फायलिंगद्वारे याची घोषणा केली आहे. GeM प्लॅटफॉर्म सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांना पारदर्शक आणि कार्यक्षम रीतीने सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी अँड टू अँड ऑनलाइन मार्केटप्लेस प्रदान करते.

विशेष म्हणजे सध्या हे ई-मार्केटप्लेस २ ट्रिलियन रुपयांचे एकूण व्यापारी मूल्य (GMV) असलेला बाजार हाताळते. त्यात सध्या ८००,००० हून अधिक मध्यम आणि लघु उद्योगांसह ६.५ दशलक्षापेक्षा जास्त विक्रेते आणि सेवा प्रदाते आहे, तर ७०,००० पेक्षा जास्त खरेदीदार संस्थांचा समावेश आहे, सध्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासंदर्भात बरीच आव्हाने आहेत.

Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील

हेही वाचाः SBI ने मुकेश अंबानींच्या १७ ट्रिलियनच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला टाकले मागे, १० वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

भागीदारीनंतर TCS विद्यमान प्लॅटफॉर्मला नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी एक नवीन अत्याधुनिक योजना तयार करणार आहे. नवीन GeM प्लॅटफॉर्म ई-कॉमर्स आणि ई-मार्केटप्लेस तत्त्वांवर आधारित असेल, ज्यामध्ये बहु भाडेकरार, बहु-नियम, बहुभाषिक, मुक्त स्रोत आणि ओपन एपीआय आधारित तंत्रज्ञान असेल. नवीन प्लॅटफॉर्म इंटरऑपरेबिलिटी आणि क्लाऊड न्यूट्रॅलिटीच्या माध्यमातून डिझाइन केले जाणार आहे, ते तंत्रज्ञान खरेदीदार आणि विक्रेत्याला फायदेशीर ठरेल, अशीही माहिती मिळाली आहे.

हेही वाचाः IT क्षेत्रालाही मंदीचा फटका; टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमधील नोकऱ्या गायब?

“GeM ची संकल्पना ही सरकारी खरेदीसाठी सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी झाली आहे. विशेष म्हणजे यात व्यवसाय करण्याची सुलभता आणि पारदर्शकता प्रदान करण्यात आली आहे. TCS बरोबरच आमचा भागीदार म्हणून आम्ही नवीन GeM जगाच्या उत्कटतेने तयार करण्याचे आश्वासन देतो. आकर्षक डिझाइन, समृद्ध वापरकर्ता अनुभव आणि नावीन्यपूर्ण सेवांसह हे प्लॅटफॉर्म तुमच्या सेवेत असेल, असंही GeM चे सीईओ पी. के. सिंग म्हणालेत.