देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) पाच लाखांहून अधिक सॉफ्टवेअर अभियंत्यांना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चे प्रशिक्षण देणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
कंपनीच्या नुकत्याच स्थापन झालेल्या ‘AI.Cloud’ युनिटचे प्रमुख शिवा गणेशन यांनी PTI ला ही माहिती दिली. ते म्हणाले, व्यवसायाची संधी म्हणून जनरेटिव्ह एआय अजूनही त्याच्या नव्या अवस्थेत आहे आणि त्याचा वापर अजूनही कमी आहे. कंपनी ग्राहकांसाठी चालू असलेल्या कामांना गती देण्यासाठी जनरल एआयकडून मिळालेल्या माहितीचा वापर करीत आहे.
हेही वाचाः ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल यांनाही राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, शेअर केला ‘हा’ फोटो
कंपनीने काही महिन्यांपूर्वी २५० जनरेटिव्ह एआय चालित प्रकल्पांमध्ये आपला सहभाग जाहीर केला होता. गणेशन म्हणाले, “कदाचित ते आता कमी वापरले जात आहे. मोठ्या बदलांपूर्वीचा हा काळ आहे. आम्ही पूरक संपत्ती आणि वाढीबद्दलदेखील बोललो आहोत, यासाठी अद्याप काही टाइमलाइन निश्चित केलेली नाही, परंतु मला वाटते की आता थांबून पाहू यात. त्याचे खरे परिणाम येत्या तिमाहीत समोर येणार आहेत.
हेही वाचाः SBI कडून ग्राहकांसाठी Green Rupee Term Deposit योजना सुरू, कोण करू शकते गुंतवणूक?
पुढे ते म्हणाले, “कामगार तयार केले जात असून, येत्या काळात संपूर्ण संस्था स्वतः एआयसाठी तयार असेल. जनरल एआय कौशल्य असलेल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याच्या टाइमलाइनबद्दल विचारले असता गणेशन यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. सध्याची प्रगती पाहता सात महिन्यांत १.५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.