मुंबईः पुण्यात मुख्यालय असलेली पर्यावरणीय अनुपालन आणि सल्लागार क्षेत्रातील कंपनी टेक्नोग्रीन सोल्यूशन्स लिमिटेडने, मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई एसएमई’ बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) नुकताच मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> जगभरात साखरेचा गोडवा कमी होणार? भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भागविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर कंपनीच्या धोरणात्मक वाढीच्या उपक्रमांना निधी म्हणून केला जाईल. संशोधन आणि विकास, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, अनुभवी संसाधनांची नियुक्ती करून संस्थेचा एकंदर व्यवसायवाढीचा व्यूह मजबूत करण्यासाठी तसेच कंपनीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी आंशिक रूपात केला जाईल, असे टेक्नोग्रीन सोल्यूशन्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ओझा यांनी सांगितले. कंपनीच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या भांडवल उभारणीच्या माध्यमातून कंपनी संपूर्ण भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहकांना नावीन्यपूर्ण आणि टिकाऊ पर्यावरणीय उपाय वितरीत करण्याच्या उद्दिष्टाला गती देणार आहे, असे ते म्हणाले. इंडोरियंट फायनान्शियल सर्विसेस लि. ही कंपनीच्या प्रस्तावित भागविक्रीसाठी व्यवस्थापन म्हणून, तर कंपनीची सल्लागार म्हणून इक्वीरिसर्च काम पाहत आहे.