नवी दिल्ली : देशांतर्गत पातळीवर दूरसंचार उद्योगातील दर जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी पातळीवर असल्याचे भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोपाल विट्टल यांनी बुधवारी सांगितले. दूरसंचार कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीवर परतावा गुणोत्तर सुधारण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>‘बचतदार ते गुंतवणूकदार गतिमान संक्रमण स्वागतार्हच’; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून १० वर्षातील प्रगतीचे गुण गाण

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Pune ranks fourth in the world in slow traffic Pune print news
मंद वाहतुकीत पुणे जगात चौथे
Indian Cities With Slowest Traffic
Indian Cities With Slowest Traffic : जगातील सर्वात मंद वाहतूक असलेल्या टॉप ५ शहरांमध्ये तीन भारतीय; मुंबई-पुण्याचा क्रमांक किती? येथे वाचा संपूर्ण यादी
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका

सध्या देशात तीन मुख्य कंपन्या ग्राहकांना दूरसंचार सेवा पुरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा अतिशय तीव्र आहे. गेल्या महिन्यात आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडियाने भांडवल उभारणी केली. ही आनंददायी बाब आहे. कारण प्रतिस्पर्धी कंपनी असली तरी दूरसंचार क्षेत्रात अधिकाधिक कंपन्यांनी टिकून राहणे आवश्यक आहे. ५जी सेवांचे दालन खुले झाल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली असून अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आहे. परिणामी एकीकडे खर्च वाढता असून त्या तुलनेत मात्र दूरसंचार दर खूपच कमी आहेत. यामुळे कंपन्यांच्या परताव्यात वाढ होणे आवश्यक असल्याचे विट्टल म्हणाले. भारती एअरटेलचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (आरपू) वर्षभरापूर्वीच्या १९३ रुपयांवरून आठ टक्क्यांनी वाढून २०९ रुपये रुपयांवर पोहोचला आहे. मुख्यतः नायजेरियन चलन नायराच्या अवमूल्यनामुळे एअरटेलच्या मार्च तिमाहीतील एकत्रित नफ्यात ३१ टक्क्यांनी घसरण झाली असून तो २,०७२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर सरलेल्या मार्च तिमाहीत एकत्रित महसूल ४.४ टक्क्यांनी वाढून ३७,५९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३६,००९ कोटी रुपये राहिला होता.

Story img Loader