पीटीआय, नवी दिल्ली

अमेरिकेतील आघाडीची विद्युत वाहन (ईव्ही) निर्माता कंपनी ‘टेस्ला’ने भारतात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामध्ये व्यवसाय कार्यचालन विश्लेषक आणि ग्राहक तज्ज्ञांचा समावेश आहे, जे टेस्लाच्या भारतातील ई-व्ही क्षेत्रातील प्रवेशाचे संकेत मानले जात आहेत.

कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, वरील पदे ही मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी आहेत. या पदांमध्ये सेवा सल्लागार, सेवा तंत्रज्ञ, सेवा व्यवस्थापक, विक्री आणि ग्राहक समर्थन तज्ज्ञ, स्टोअर व्यवस्थापक, व्यवसाय कार्यचालन विश्लेषक, पर्यवेक्षक, वितरण विशेषज्ज्ञ, कार्यादेश विशेषज्ञ, अंतर्गत विक्री सल्लागार आणि ग्राहक सहभाग व्यवस्थापक यांचा समावेश आहे. ही भरती कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेशाच्या योजनांचा भाग आहे का? या प्रश्नावर टेस्लाकडून अद्याप अधिकृतरित्या उत्तर मिळू शकलेले नाही. शिवाय भारतीय बाजारपेठेत वाहनांची विक्री सुरू करण्याची संभाव्य वेळेबाबत देखील तिने अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’ येथे राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादात भेट झाली होती. भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या संभाव्य प्रवेशाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये, मस्क यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा प्रस्तावित भारत दौरा पुढे ढकलला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्याभेटीमुळे भारतात ईव्ही विक्रीसाठी टेस्ला लवकरच योजना जाहीर करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने नवीन ईव्ही धोरण जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी मस्क यांचा भारत दौरा नियोजित होता, ज्या अंतर्गत देशात किमान ५० कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणुकीसह उत्पादन केंद्र स्थापन करणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्कात सवलती दिल्या जातील, हे पाऊल टेस्लासारख्या प्रमुख जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने उचलण्यात आले होते.टेस्लाचे प्रतिनिधी आणि भारतातील सर्व प्रमुख वाहन निर्मात्यांसह, मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्र, किआ, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया, रेनॉ, मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांच्यासह नवीन ईव्ही धोरणावरील भागधारकांच्या बैठकीत सहभागी झाले होते.

Story img Loader