जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी भारतात गुंतवणूक केली, तर नक्कीच भारतीय वंशाची व्यक्तीच आता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. होय, कारण टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीची नवीन CFO म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीचे सध्याचे वित्त प्रमुख जॅकरी किर्कहॉर्न यांचा राजीनामा हे त्यामागचे कारण आहे. वैभव तनेजा असे या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव असून, ते टेस्लामध्ये मुख्य लेखा अधिकाऱ्या (CAO) ची जबाबदारी सांभाळत आहेत. आतापासून फक्त वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील, असंही टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किर्कहॉर्न १३ वर्षे टेस्लामध्ये राहिले

टेस्लाचे वित्त प्रमुख जॅकरी किर्कहॉर्न यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर सोमवारी बाजार उघडल्यानंतर कंपनीने ४५ वर्षीय वैभव तनेजा यांना आपला नवीन सीएफओ बनवल्याची माहिती दिली. याआधी जॅकरी किर्कहॉर्न हे टेस्लाचे मास्टर ऑफ कॉईन आणि फायनान्स चीफ म्हणून गेली ४ वर्षे जबाबदारी सांभाळत होते. किर्कहॉर्नची टेस्ला येथील कारकीर्द १३ वर्षांची आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात टेस्ला यांनी मजल दरमजल प्रवास करीत प्रगती साधली आहे. आपल्या निरोपाच्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिले, ‘टेस्लामध्ये काम करणे हा एक अनोखा अनुभव होता. मी कंपनीत केलेल्या सर्व कामांचा मला अभिमान आहे. मी येथील कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो की, जवळजवळ अशक्य वाटणारे काम आम्ही पूर्ण केले आहे.

हेही वाचाः Money Mantra : वारसाहक्क किंवा वडिलोपार्जित मिळालेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबतचा प्राप्तिकर विभागाचा नियम काय? जाणून घ्या

तनेजा २०१६ पासून टेस्लाबरोबर

जॅकरी किर्कहॉर्नची जागा घेणारे भारतीय वंशाचे वैभव तनेजा मार्च २०१६ पासून टेस्लाबरोबर काम करीत आहेत. ते यापूर्वी सोलारसिटी कॉर्पोरेशन कंपनीत वित्त आणि इतर खात्यांचे काम पाहत होते. मार्च २०१६ मध्ये टेस्लाने ही कंपनी ताब्यात घेतली आणि वैभव तनेजा टेस्लाचे कर्मचारी झाले. २०१७ मध्ये कंपनीने त्यांना सहाय्यक कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून आणि मे २०१८ मध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून पदोन्नती दिली. वैभव तनेजा हे मार्च २०१९ पासून टेस्लाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.

हेही वाचा: ITR Filing : गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-जूनदरम्यान दुप्पट ITR भरले, रिटर्नची संख्या ‘इतक्या’ कोटीनं ओलांडली

याआधी वैभव तनेजा ‘प्राइस वॉटर हाऊस कूपर्स’मध्ये कर्मचारी होते. वैभव तनेजा (४५) दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहेत आणि २०१६ मध्ये कंपनीने सोलारसिटीचे अधिग्रहण केल्यानंतर ते टेस्लाच्या टीमचा एक भाग बनले. मुख्य लेखा अधिकारी म्हणून त्याच्या प्राथमिक जबाबदारीबरोबरच त्यांनी “मास्टर ऑफ कॉईन” ची महत्त्वपूर्ण भूमिका कंपनीत स्वीकारली. जानेवारी २०२१ मध्ये वैभव तनेजा यांची टेस्लाच्या भारतीय शाखा, टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसाठी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. वैभव यांना अकाऊंटिंगचा २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तंत्रज्ञान, वित्त, रिटेल आणि दूरसंचार क्षेत्रात त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tesla preparing to come to india elon musk appoints indian origin as new cfo vrd