डेट्रॉईट : विद्युत वाहनांची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांना विक्रमी ४४.९ अब्ज डॉलरचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सुमारे ७७ टक्के भागधारकांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे.मस्क यांनी वेतनमान २०१८ मध्ये टेस्लाकडून मंजूर केले गेले होते, परंतु जानेवारी २०२४ मध्ये डेलवेअर न्यायालयाने ते रद्द केले होते. त्यानंतर टेस्लाचे मुख्याधिकारी मस्क यांनी ते पुन्हा मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली.

हेही वाचा >>> निर्यात ९ टक्क्यांनी वधारून ३८.१३ अब्ज डॉलरवर

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कंपनीचा या वेतन योजनेला भागधारकांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रेगरी वॅरालो यांनी विरोध केला आहे. मस्क यांनी केलेली मागणी आणि बळजबरीने मंजूर केलेले वेतन हे कायद्याच्या दृष्टीनेही सदोष असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच ते कायद्याच्या कसोटीवर कुचकामी ठरले असून आम्ही योग्यवेळी युक्तिवादाला प्रतिसाद देऊ अशी प्रतिक्रिया वॅरालो यांनी दिली.

टेस्लाने मस्क यांना ५६ अब्ज डॉलर वेतन देऊ केले होते. मात्र दरम्यानच्या काळात टेस्लाच्या समभागांचे मूल्य घटल्याने वेतनात घट होऊन ते ४४.९ अब्ज डॉलरपर्यंत खाली आले. टेस्लाचे समभाग मूल्य विद्यमान वर्षात सुमारे २५ टक्क्यांनी घसरले आहे. गुरुवारी उशिरा भागधारकांनी मस्क यांचा मेहनताना ठरविण्यासाठी मतदान केले. मस्क यांच्या बाजूने मतदान झाल्यानंतर टेस्लाच्या समभागांनी गुरुवारच्या सत्रात ३ टक्क्यांनी उसळी घेतली.

Story img Loader