पीटीआय, नवी दिल्ली

प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ पर्यंतच्या चार वर्षांत झडती आणि जप्तीची कारवाई करून, देशभरात ५,०९५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत दिली. विभागाने करबुडव्या २,९८० संस्था अथवा व्यक्तींवर या काळात ही जप्ती कारवाई केली आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!

या संबंधाने तपशील देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ९८४ जणांवर कारवाई केली. त्यातून १,२८९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, तर या प्रकरणी ३५६ खटले दाखल करण्यात आले. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ५६९ जणांवर कारवाई करून ८८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि १४५ खटले दाखल करण्यात आले. विभागाने २०२१-२२ मध्ये ६८६ व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करून १,१५९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणी ११५ खटले दाखल झाले. मागील आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये ७४१ व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करून १,७६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या प्रकरणी ९७ खटले दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>>ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे अन् साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांपर्यंत वाढ!

प्राप्तिकर विभागाने छाप्यांदरम्यान गोळा केलेले पुरावे, चौकशी आणि तपासाअंती करविषयक मूल्यांकन केल्यानंतर, करबुडव्यांकडून अंतिम कर मागणी ही उत्तरोत्तर वाढत आली आहे, असे निरीक्षणही चौधरी यांनी नमूद केले. मागील चार आर्थिक वर्षांत किती व्यावसायिक आस्थापनांवर प्राप्तिकर विभागाने छापे घातले, याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राप्तिकर कायदा १९६१ मध्ये ‘छापा’ असा शब्दप्रयोग होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.