nikesh arora success story : भारतीय वंशाचे टेक कंपनीचे सीईओ निकेश अरोरा यांच्या नावे एक नवीन विक्रम जोडला गेला आहे. गुगलपासून सॉफ्टबँकेपर्यंत अनेक ठिकाणी काम केलेले अरोरा आता २०२४ मधील जगातील सर्वात नवे आणि पहिले अब्जाधीश सीईओ बनले आहेत. ब्लूमबर्ग डेटामध्ये ही बाब समोर आली आहे.
निकेश यांची एकूण संपत्ती इतकी झाली
निकेश अरोरा यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. सध्या ते पाओ अल्टो नेटवर्क्स या सायबर सुरक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, निकेश अरोरा यांना पाओ अल्टो नेटवर्क्सचे सीईओ म्हणून मोठा पगार मिळत आहे. त्याशिवाय त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे निकेश अरोरा यांची सध्याची संपत्ती दीड अब्ज डॉलर्स झाली आहे.
बिगर संस्थापक असलेले सीईओ बनले अब्जाधीश
भारतीय चलनात त्यांची सध्याची एकूण संपत्ती १.२५ लाख कोटी रुपये आहे. निकेश अरोरा हे २०२४ मध्ये जगातील पहिले आणि सर्वात नवे अब्जाधीश म्हणून समोर आले आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या नावापुढे हे यशही जोडले आहे की, ते काही अव्वल टेक अब्जाधीशांपैकी एक आहेत, जे बिगर संस्थापक आहेत.
हेही वाचाः इस्रो आणि एलॉन मस्क पहिल्यांदाच एकत्र, अवकाशात रचणार इतिहास; जाणून घ्या काय आहे मिशन?
पाओ अल्टो नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात शेअर्स
निकेश अरोरा यांनी २०१८ मध्ये Pao Alto Networks चे CEO म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना त्यावेळी १२५ दशलक्ष डॉलर किमतीचे शेअर आणि पर्याय पॅकेज मिळाले. त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पेमेंटमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. सध्या त्यांचा पाओ अल्टो नेटवर्क्समध्ये मोठा हिस्सा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pao Alto Networks च्या शेअर्सची किंमत ४ पटीने वाढली आहे. अशा प्रकारे निकेश अरोरा यांच्या शेअरचे मूल्य ८३० दशलक्ष डॉलर्स झाले आहे.
२०१२ मध्ये गुगलचा सर्वात महागडा कर्मचारी
निकेश पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आले, जेव्हा ते २०१२ मध्ये गुगलचे सर्वात महागडे कर्मचारी बनले. त्यानंतर त्यांना Google वर सुमारे ५१ दशलक्ष डॉलर पॅकेज देण्यात आले, जे इतर कोणत्याही एक्झिक्युटिव्हपेक्षा जास्त होते. तेथून सॉफ्टबँकचे मासायोशी सान निकेशला त्यांच्या कंपनीत घेऊन गेले. तोपर्यंत गुगलमधील निकेशच्या शेअर अवॉर्डचे मूल्य २०० दशलक्ष डॉलर ओलांडले होते.
हा विक्रम सॉफ्टबँकेने केला
निकेश यांचा सॉफ्टबँकमधील कार्यकाळही खूप चर्चेत होता. ते २०१४ मध्ये सॉफ्टबँकमध्ये सामील झाले आणि सॉफ्टबँकेने त्यांना पहिल्या वर्षीच १३५ दशलक्ष डॉलरचे पॅकेज दिले. त्यावेळी जपानमध्ये हे पॅकेज केवळ सर्वोच्च नव्हतेच, शिवाय निकेश यांचे नाव सर्वोत्कृष्ट पगाराच्या जागतिक कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये होते. एकेकाळी त्यांना सॉफ्टबँक ग्रुपमधील मसायोशी सॅनचे उत्तराधिकारी मानले जात होते.