पीटीआय, नवी दिल्ली
कॉलर आयडी आणि स्पॅम संरक्षण ॲप म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्रूकॉलरला पसंतीचे माप देत, या क्षेत्रावरील वर्चस्वाचा गैरवापर केल्याची गूगल इंडिया विरुद्ध दाखल तक्रार भारतीय स्पर्धा आयोगाने गुरुवारी फेटाळून लावली. स्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे स्पष्ट करत, आयोगाने गूगल इंडियाला दिलासा दिला.
रचना खैरा यांनी स्पर्धा आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गूगलने ट्रूकॉलरला खासगी संपर्क माहिती सामायिक करण्यासाठी मंजुरी दिली, तर तिच्या मंचावरील इतर ॲप्सना मात्र तसे करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. शिवाय या क्षेत्रात ट्रूकॉलरची मक्तेदारी निर्माण झाली आहे, असा आरोप देखील खैरा यांनी केला होता. गूगलचे धोरण हे कायम कोणतीही माहिती विशेषतः संपर्कासंबंधित माहिती परवानगी शिवाय इतरांना न देण्याचे धोरण आहे. मात्र ट्रूकॉलरला माहितीची देवाणघेवाण करण्याची परवानगी आहे. खैरा यांनी आरोप केला की, गूगलच्या क्लाउड स्टोरेज आणि जाहिरात सेवांचा समावेश असलेल्या व्यावसायिक व्यवस्थेमुळे ट्रूकॉलरला पसंती दिली गेली आहे.स्पर्धा आयोगाने गूगल आणि खैरा या दोघांच्या युक्तिवादाचे अवलोकन केल्यानंतर, गूगलवर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा निर्णय दिला.