Flipkart Co-Founder : एका साध्या खोलीतून लहान व्यवसायाला सुरुवात करून फ्लिपकार्टला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या बन्सल ब्रदर्सचा काळ आता संपुष्टात आला आहे. सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बन्सल यांनीही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टमधील आपले उर्वरित शेअर्स विकले आहेत. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, फ्लिपकार्टचे सह संस्थापक बिन्नी बन्सल आणि कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार एक्सेल आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट यांनी वॉलमार्टला त्यांचा हिस्सा विकून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ मध्ये जेव्हा वॉलमार्टने कंपनीचा हिस्सा विकत घेतला, तेव्हा एक्सेल आणि Tiger Global Management या दोघांकडे सुरुवातीला Flipkart मधील २० टक्क्यांहून अधिक भागभांडवल होते, परंतु २०१८ मध्ये वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्यापूर्वी हळूहळू त्यांची हिस्सेदारी कमी केली आणि ती सुमारे ६ टक्क्यांपर्यंत खाली आली.

हेही वाचाः जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करणार, DGCA ने एअरलाइन कंपनीला दिली मंजुरी

वॉलमार्टने २०१८ मध्ये भागभांडवल विकत घेतले

वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमधील कंट्रोलिंग शेअर्स विकत घेतले. अधिग्रहणानंतरही एक्सेलने अलीकडेपर्यंत कंपनीतील १.१ टक्के हिस्सा राखून ठेवला होता. २०२३ मध्ये एक्सेल कंपनी फ्लिपकार्टमधून बाहेर पडली. कंपनीने गेल्या काही वर्षांत सुमारे ६०-८० दशलक्ष डॉलर गुंतवणुकीवर २५ ते ३० पट परतावा मिळवला आहे.

तसेच वॉलमार्टच्या अधिग्रहणानंतर टायगर ग्लोबलची देखील फ्लिपकार्टमध्ये कमीच भागीदारी शिल्लक राहिली होती, परंतु वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सुमारे ३.५ अब्ज डॉलर नफा कमावल्यानंतर आता टायगर ग्लोबल फ्लिपकार्ट कंपनीतून बाहेर पडली आहे. Flipkart सह संस्थापक सचिन बन्सल यांनी आधीच २०१८ मध्ये वॉलमार्टला त्यांचे संपूर्ण शेअर्स विकले होते, तर त्यांचे भागीदार आणि इतर सह संस्थापकांनी फ्लिपकार्टची भागीदारी घेतल्यानंतर बिन्नी बन्सल यांनी एक छोटासा हिस्सा कायम ठेवला होता.

हेही वाचाः २०३० मध्ये देशाचे दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलरपर्यंत जाणार, जीडीपी थेट ६ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज, पण कसा?

तर काहींच्या मते बिन्नी बन्सल यांनी आता त्यांचे उर्वरित शेअर्स वॉलमार्टला विकले आहेत आणि वर उल्लेख केलेल्या तीन लोकांनुसार त्यांनी स्थापनेपासून बाहेर पडण्यापर्यंत सुमारे १ ते १.५ अब्ज डॉलर कमावले आहेत. हा करार सुमारे ३५ बिलियन डॉलरच्या मूल्यांकनात झाला, जो फ्लिपकार्टची वाढ दर्शवितो. “बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टमधील त्यांचे उर्वरित १ ते १.५ टक्के शेअर्स विकले आहेत, परंतु ते कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहणार असल्याचीही माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The end of the bansal era in flipkart binny sold the company what next vrd
Show comments