मुंबई : चालू वर्षात सणासुदीला बाजार गर्दीने फुललेले दिसले असले तरी प्रत्यक्षात विक्रेत्यांच्या खपातील वाढीचा दर निम्म्याने घसरून, १५ टक्क्यांवरच सीमित राहिल्याचे जपानची दलाली पेढी नोमुराने बुधवारी प्रसिद्ध केलेले टिपण दर्शविते.यंदाच्या सणासुदीच्या काळात किरकोळ विक्री (ऑफलाइन आणि ऑनलाइन) वाढली आहे, परंतु एकूण वाढीचा दर तुलनेने घटला आहे, असे नोमुराच्या टिपणाने म्हटले आहे. वस्तू व उत्पादनांच्या खपातील वाढ २०२३ मधील दिवाळीच्या दिवसांमध्ये ३२ टक्के आणि २०२२ मध्ये ८८ टक्के होती. शहरी ग्राहकांनी खरेदीत आखडता घेतलेला हात याला कारण ठरल्याचे विश्लेषकांनी नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागात आणि दुय्यम व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये सणासुदीची मागणी स्थिर राहिली, तर महानगरांमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमकुवत राहिल्याने एकूण ग्राहक मागणीत नीरसता दिसून आली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्रालयाने शहरी मागणी कमजोर असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. नोमुराच्या विश्लेषकांच्या मते, डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सणासुदीच्या विक्रीतील कसर भरून काढली जाईल.
किरकोळ विक्रीतील वाढ ३६.४ टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत रोडावली. ई-कॉमर्स विक्री वाढली आहे, तर सोन्याची विक्री ही मूल्यानुरूप, मात्र वजनानुरूप विक्रीचे प्रमाण २०२४ मध्ये घटलेले दिसेल, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अंदाजाचा हवाला नोमुरानेही तिच्या टिपणांत दिला आहे.