सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचे देशाचे पहिले मिशन आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रात गुंतवणूकदारांची आवड वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय खासगी खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडू शकतो. Larsen & Toubro (L&T), MTAR टेक्नॉलॉजीज आणि अनंत टेक्नॉलॉजीजसह अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या सौर वेधशाळा मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सूर्याभोवतालच्या प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 शनिवारी PSLV-C57 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले असून, ते १२५ दिवसांचा प्रवास करणार आहे. जे पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी दूर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधील एकूण १५० दशलक्ष किमीच्या फक्त १ टक्के आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांसारख्या अनेक संस्थांनी देखील या ऐतिहासिक मोहिमेत योगदान दिले आहे. प्रक्षेपणाच्या यशाची घोषणा करताना इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शनिवारी सांगितले की, आदित्य एल 1 अंतराळयान (मध्यवर्ती कक्षेत) ठेवण्यात आले आहे.
ISPA काय म्हणते?
भारतीय अंतराळ परिसंस्थेसाठी हा आणखी एक यशस्वी टप्पा आहे. जिने अलीकडेच चांद्रयान ३ च्या रूपाने यश मिळवले आहे. इंडियन स्पेस असोसिएशनचे (ISPA) महासंचालक ए के भट्ट यांच्या मते, ही कामगिरी चांद्रयान ३ च्या मोहिमेनंतर भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. हे केवळ अंतराळ संशोधनातील भारताची क्षमताच दर्शवत नाही तर आपल्या खासगी क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोग करण्याच्या आणि जागतिक अवकाश उद्योगात योगदान देण्याच्या क्षमतेवर विश्वास निर्माण करते. या यशांमुळे आमच्या खासगी अंतराळ कंपन्यांसाठी निधीची शक्यता देखील वाढणार आहे. सूर्याच्या अभ्यासात मदत करणाऱ्या कंपन्यांबद्दल जाणून घेऊयात.
L अँड T ने अनेक घटक दिले
L&T जे भारताच्या नवीन चंद्र मोहिमेच्या जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये सामील होते, त्यांनी सौर मोहिमेसाठी अनेक प्रमुख घटकदेखील प्रदान केले आहेत. L&T संरक्षण विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख एटी रामचंदानी म्हणाले, “आम्हाला भारताच्या पहिल्या सौर मोहिमेसाठी ISRO बरोबर भागीदारी करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे. आदित्य L1 साठी L&T ने स्पेस ग्रेड अभियांत्रिकी, उत्पादन कौशल्ये आणि प्रशिक्षित कार्यबल तयार केले आहे. हार्डवेअर प्रदान केले आहे. इस्रोबरोबरच्या पाच दशकांच्या भागीदारीचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले. L&T देखील गगनयान मोहिमेचा एक भाग आहे.
आदित्य L1 मिशन ४४.४ मीटर उंच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) द्वारे प्रक्षेपित केले गेले, जे अंतराळ क्षेत्रातील भारताचे विश्वासार्ह वर्कहोर्स आहे. इस्रोने केलेल्या ९१ पैकी ५९ प्रक्षेपणांमध्ये PSLV रॉकेटचा वापर करण्यात आला. मात्र, या मोहिमेची खरी किंमत अद्याप कळू शकलेली नाही. यासाठी सरकारने सुमारे ४८ दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली आहे.
एटीएलने पीएसएलव्हीच्या ४८ उपप्रणाली दिल्या
हैदराबाद आधारित अनंत टेक्नॉलॉजीज (ATL) ने उपग्रह प्रणाली डिझाइन आणि विकास आणि एकात्मता यामधील आपल्या अफाट अनुभवातून आदित्य L1 कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. आदित्य L1 मिशनमध्ये ATL ने अनेक एव्हीओनिक्स पॅकेजेस तयार केलीत. या पॅकेजेसमध्ये ऑनबोर्ड कॉम्प्युटर, स्टार सेन्सर्स, मॉड्यूलर ईईडी सिस्टीम आणि पेलोड डीसी, डीसी कन्व्हर्टर यांचा समावेश आहे.
PSLV-C57 प्रक्षेपण वाहनासाठी ATL ने ट्रॅकिंग ट्रान्सपॉन्डर्स आणि अनेक इंटरफेस युनिट्स यांसारख्या 48 उपप्रणाल्यांचा पुरवठा केला आणि असेंब्ली, एकत्रीकरण आणि चाचणी पूर्ण केली. PSLV-C57 हे ATL संघाने एकत्रित केलेले सातवे प्रक्षेपण वाहन आहे आणि सध्या आणखी पाच प्रक्षेपण वाहने एकत्रीकरणाअंतर्गत आहेत. ATL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुब्बा राव पावलुरी म्हणाले की, ही भागीदारी आमच्यासाठी मैलाचा दगड ठरेल, कारण आम्ही भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या तांत्रिक उत्कृष्टतेचे आणि उत्पादनात योगदान देत आहोत.
एमटीएआर टेक्नॉलॉजीजने दिले असे योगदान
एमटीएआर टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक पर्वत श्रीनिवास रेड्डी म्हणाले की, भारतीय अंतराळ क्षेत्रात झालेली प्रचंड वाढ हे इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ आहे. MTAR ला अभिमान आहे की, ISRO च्या सर्व प्रक्षेपणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. आम्ही मिशनसाठी वापरल्या जाणार्या PSLV-C57 लाँच व्हेइकलसाठी डेव्हलपमेंट इंजिन, इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूल, व्हॉल्व्ह, सेफ्टी कप्लर्स यासारख्या यंत्रणा पुरवल्या आहेत.