मुंबई : अदानी समूहाने अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेख्यांमध्ये खोटेपणासह, समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत लबाडीने फेरफार केल्याच्या अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था हिंडेनबर्गच्या आरोपाचे देशांतर्गत भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले. देशांतर्गत भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक १ टक्का घसरणीसह तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर स्थिरावले.

हेही वाचा >>>टाटा मोटर्सची प्रवासी वाहने महागणार; समभागाच्या चमकदार कामगिरीसह बाजारभांडवलात ८,८१९ कोटींची भर

stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
households savings shift from bank fds to mutual funds and insurance in last 3 years
घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
Market study of year 2024
बाजार रंग : सरत्या वर्षाचा बाजार अभ्यास
Rupee continues to decline against US dollar
रुपयाची ८५ पार धूळदाण
Sensex falls by 964 points print eco news
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
What is the reason for the fall in the stock market and rupee
विश्लेषण: शेअर बाजार, रुपया पडण्याचे कारण काय?
Indian stock market , Sensex, NSE Nifty Index
विश्लेषण : अपेक्षेप्रमाणे अमेरिकेत व्याजदरात कपात, तरी शेअर बाजार, रुपया पडण्याचे काय?

अदानी समूहातील कंपन्यांमधील समभागांच्या घसरणीसह बँकिंग, वित्तीय आणि तेल कंपन्यांच्या समभागांची जोरदार आपटी खाल्ली. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात १,२३० अंश गमावले होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८७४.१६ अंशांनी म्हणजेच १.४५ टक्क्यांनी घसरून ५९,३३०.९० अंशांवर बंद झाला. २१ ऑक्टोबरनंतरची सेन्सेक्सची नीचांकी पातळी आहे. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने १,२३०.३६ अंशगमावत ५८,९७४.७० अंशांची सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २८७.६० अंशाची (१.६१ टक्के) घसरण झाली आणि तो १७,६०४.३५ पातळीवर स्थिरावला.

अदानी समूह कंपन्यांवरील प्रतिकूल संशोधन अहवालामुळे भारतीय भांडवली बाजारात तीव्र घसरण झाली. दुसरीकडे सकारात्मक तिमाही कामगिरी करून देखील बँकांच्या समभागात मोठी घसरण झाली. अदानी समूहाला सर्वाधिक कर्ज दिल्याने त्याचे भविष्यात प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने बँकांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. खासगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांना सर्वाधिक फटका बसला. तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हची बैठकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने घसरणीला अधिक चालना मिळाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>>अदानी समूहाच्या बाजारमूल्याला ४.२ लाख कोटींचा फटका

सेन्सेक्समध्ये स्टेट बँक (५.०३ टक्के), आयसीआयसीआय बँक (४.४१ टक्के), इंडसइंड बँक (३.४३ टक्के), अॅक्सिस बँक (२.०७ टक्के), कोटक बँक (२.०३ टक्के), एचडीएफसी बँक (१.९६ टक्के), रिलायन्स (१.९ टक्के) आणि एचडीएफसी (१.८७ टक्के) यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर बाजारातील घसरणीकडे दुर्लक्ष करत टाटा मोटर्स आणि महिंद्र अँड महिंद्रचे समभाग मात्र सर्वाधिक तेजीत होते.

गुंतवणूकदारांना १२ लाख कोटींचा फटका
देशांतर्गत भांडवली बाजारात दोन सत्रात झालेल्या व्यापक समभाग विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे १२.०३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकट्या अदानी समूहाला ४.२ लाख कोटींचा फटका बसला आहे. दोन दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांना त्यांच्या बाजारमूल्यातून तब्बल ४,१७,८२४ कोटी रुपयांची घसरण झाली. अदानी टोटल गॅसचे बाजारमूल्य १.०४ लाख कोटी अदानी ट्रान्समिशनचे बाजारमूल्य ८३ हजार कोटी रुपयांनी घसरले.

त्यापाठोपाठ अदानी एंटरप्रायझेसच्या बाजार भांडवलात ७७ हजार कोटी, अदानी ग्रीन एनर्जी ६८ हजार कोटी आणि अदानी पोर्ट ३५ हजार कोटी रुपयांनी घट झाली.अंबुजा सिमेंटचे बाजारमूल्य २३ हजार कोटी, अदानी पॉवरचे १० हजार कोटी, एसीसी ८ हजार कोटी कोटी आणि अदानी विल्मरचे बाजार भांडवल ७ हजार कोटींनी घटले.

Story img Loader