आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोच्या कंझ्युमर केअर अँड लायटिंगने केरळ आधारित पॅकेज्ड फूड ब्रँड ब्राह्मिंसचे अधिग्रहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी निरापारा (Nirapara) या ब्रँडची खरेदी केल्यानंतर विप्रोने भारताच्या पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये आपली भूमिका अधिक मजबूत केली आहे. संतूर साबण आणि यार्डली टॅल्क मेकर्ससारख्या पूर्वी घरगुती आणि पर्सनल केअरबरोबरच लायटिंगवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते, ते आता पॅकेज्ड फूड सेगमेंटमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. गुरुवारी विप्रो कंझ्युमर केअरने ब्राह्मिंस ब्रँड अधिग्रहणाच्या निश्चित करारावर स्वाक्षरी केल्याचे जाहीर केले. पॅकेज्ड फूडमध्ये विप्रोच्या प्रवेशानंतर अंबानी आणि अदाणी या दोन्ही समूहाच्या कंपन्यांना तगडी स्पर्धा निर्माण होऊ शकते.

ब्राह्मिंसचा व्यवसाय कोणत्या देशात पसरलाय?

१९८७ मध्ये स्थापन झालेले ब्राह्मिंस विविध प्रकारचे एथनिक ब्रेक​फास्ट प्री-मिक्स पावडर, मिक्स मसाले, मसाले पावडर, लोणचे, गोड मिक्स, गव्हाचे पदार्थ आणि इतर पॅकेज केलेले खाद्यपदार्थ विकतात. सांबर पावडर आणि पुट्टू पोडी यांसारख्या प्रमुख उत्पादनांसह हा ब्रँड देशांतर्गत बाजारपेठेत प्रथम क्रमांकावर आहे. ब्राह्मिंसची उत्पादने जीसीसी देश, यूएस, यूके आणि ऑस्ट्रेलियासह केरळ, मेट्रो शहरे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

हेही वाचाः २०२५ पर्यंत १२१ विमानतळं कार्बन न्यूट्रल होणार, ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला ‘हा’ मास्टर प्लॅन

ब्राह्मिंस हा केरळमधील मजबूत ब्रँड

विप्रो कंझ्युमर केअर आणि लायटिंगने ब्राह्मिंसचे अधिग्रहण डिसेंबरमध्ये केरळ आधारित KKR समूहाची निरापारा विकत घेतल्यानंतर केले, त्यांनी पॅक केलेले स्नॅक्स, मसाले आणि तयार खाद्यपदार्थ बाजारात कंपनीचा प्रवेश केला. विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगचे सीईओ आणि विप्रो एंटरप्रायझेसचे एमडी विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही निरापाराच्या आमच्या पहिल्या संपादनासह अन्न विभागात प्रवेश केला आणि सहा महिन्यांत आम्ही ब्राह्मिंसशी जोडले गेलो आहोत. ब्राह्मिंस हा केरळमधला एक मजबूत ब्रँड आहे, जो मसाले आणि रेडी-टू-कूक सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे.

हेही वाचाः ७३ गुंतवणूकदारांनी धुडकावली त्यांची कल्पना, तरीही तयार केले ५२ हजार कोटींचे २ स्टार्टअप्स, कोण आहेत रुची कालरा?

पाच लाख कोटी रुपयांची बाजारपेठ

विप्रोचे हे आतापर्यंतचे १४ वे ब्रँड अधिग्रहण आहे, याआधी विप्रोने एनर्जी ड्रिंक ब्रँड ग्लुकोविटा आणि पर्सनल केअर ब्रँड यार्डले खरेदी केले होते. कंपनी भविष्यात स्वतःचा पॅकेज्ड फूड ब्रँड लॉन्च करण्याचा विचार करीत आहे. भारतातील पॅकेज्ड फूड मार्केट ५ लाख कोटी रुपयांचे आहे, मध्यमवर्गीय कुटुंबे झपाट्याने नॉन-ब्रँडेड खाद्यपदार्थांकडून ब्रँडेड खाद्यपदार्थांकडे वळत आहेत, ज्यामुळे या क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. अंबानी आणि अदाणी समूहाच्या कंपन्या या क्षेत्रात पुढे जात आहेत. विप्रोच्या आगमनानंतर दोघांमध्ये खडतर स्पर्धा पाहायला मिळू शकते.