लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जेएसडब्ल्यू समूहाचा हिस्सा असलेल्या जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) २५ सप्टेंबरपासून खुली होत आहे. या माध्यमातून २,८०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार असून, कंपनीने प्रति समभाग ११३ ते ११९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Market study of year 2024
बाजार रंग : सरत्या वर्षाचा बाजार अभ्यास

ही समभाग विक्री २५ सप्टेंबरला खुली होईल आणि ती २७ सप्टेंबरला बंद होईल. गुंतवणूकदार किमान १२६ समभागांसाठी आणि त्यानंतर १२६ समभागांच्या पटीत बोली लावू शकतील. या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून कंपनी कर्जफेडीसाठी ८८० कोटी रुपये, एलपीजी टर्मिनल प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी ८६५ कोटी रुपये, वीज उपकेंद्र उभारणीसाठी ५९ कोटी रुपये, ड्रेजरची खरेदी आणि उभारणीसाठी १०३ कोटी रुपये, मंगळूरु कंटेनर टर्मिनलच्या विस्तारासाठी १५१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

हेही वाचा… गोयल सॉल्ट ‘आयपीओ’द्वारे १८.१६ कोटी उभारणार!

कोकणात जयगड बंदर, मूरगाव (गोवा) बंदर सांभाळत असलेली जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर ही बंदराशी निगडित पायाभूत सुविधा उभी करणारी कंपनी आहे. कंपनीकडून जलवाहतुकीशी निगडित सेवा दिल्या जातात. त्यात मालाची हाताळणी, साठवणूक यासह इतर सेवांचा समावेश आहे. कंपनीची माल हाताळणीची वार्षिक क्षमता यंदा ३० जूनअखेरीस १५.८४ कोटी टन होती.

Story img Loader