देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी सुरिंदर चावला यांनी मुंबईतील लोअर परेल भागात २० कोटी रुपयांना डुप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे. हे अपार्टमेंट इंडियाबुल्स स्काय फॉरेस्ट नावाच्या लक्झरी टॉवरमध्ये आहे आणि सुमारे २५१६ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. ही माहिती Zapkey.com द्वारे प्राप्त कागदपत्रांवरून प्राप्त झाली आहे.
हा फ्लॅट वरच्या मजल्यावर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ ९७२ चौरस फूट आहे, तर त्याचे कार्पेट क्षेत्र २५१६ चौरस फूट आहे. चावला यांना या डुप्लेक्स अपार्टमेंटसह चार पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. माधुरी विनायक गावंडे असे अपार्टमेंट विक्रेत्याचे नाव आहे.
इंडियाबुल्स स्काय फॉरेस्टमध्ये अनेक हायप्रोफाईल डील
कागदपत्रांनुसार, हा व्यवहार २२ ऑगस्ट २०२३ रोजी नोंदणीकृत झाला होता. मध्य मुंबईत असलेल्या इंडियाबुल्स स्काय फॉरेस्टने याआधीच अनेक हायप्रोफाईल करार केले आहेत. Zapkey.com च्या माहितीनुसार, २०२२ मध्ये मुंबईतील टॉप १०० गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुमारे ४३,००० कोटी रुपयांची घरे विकली गेलीत. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ही घट सुमारे २.५ टक्क्यांची आहे.
मुंबईतील टॉप १० गृहनिर्माण प्रकल्प माहीत आहेत का?
मुंबईतील टॉप १० गृहनिर्माण प्रकल्पांबद्दल बोलायचे झाल्यास या यादीत वरळीतील बिर्ला नियारा (१८२५ कोटी), वरळीतील लोढा द पार्क (१५७२ कोटी), महालक्ष्मीमधील रहेजा विवरिया (११५६ कोटी), पूर्वेकडील बोरिवली या भागाचा समावेश आहे. तसेच ओबेरॉय स्काय सिटी (१०९२ कोटी), वरळीतील लोढा वर्ल्ड टॉवर्स (९५६ कोटी), पवईमधील एल अँड टी एमराल्ड आयल (९४० कोटी), लोअर परेलमधील इंडियाबुल्स स्काय फॉरेस्ट (९३८ कोटी), मुलुंड पश्चिममधील प्रेस्टीज बेलान्झा (८८३ कोटी) आणि गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय एलिशियन (८७८ कोटी) या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये महागडी घरे आहेत.