ONGC Videsh gets Navratna status : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ओएनजीसी विदेश लिमिटेडला ‘नवरत्न’चा दर्जा दिला आहे. ONGC विदेश पहिल्यांदा श्रेणी I ‘मिनीरत्न’मध्ये होती, परंतु मंत्रालयाच्या मंजुरीनंतर तिला आता थेट ‘नवरत्न’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE)मध्ये सामील करण्यात आले आहे. CPSE च्या यादीत ONGC विदेश ही १४वी नवरत्न कंपनी ठरली आहे. ONGC Videsh Ltd ही कंपनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवली जाते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल ११,६७६ कोटी होती आणि निव्वळ नफा १७०० कोटी होता.

नवरत्न होण्यासाठी कंपनीला आधी मिनीरत्न दर्जा मिळवावा लागतो. याबरोबरच त्यांच्या संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालक असणेही आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनीने बाजारमूल्य, निव्वळ नफा, एकूण उत्पादन खर्च, मनुष्यबळ खर्च, सेवा खर्च, PBDIT यांसारख्या अनेक पॅरामीटर्समध्ये १०० पैकी ६० गुण मिळवणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, ONGC विदेश कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४१,०३९ कोटींची उलाढाल आणि ९८५४ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
industrial production
औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!

हेही वाचा: Money Mantra : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच…

‘नवरत्न’ कंपन्यांच्या यादीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एमटीएनएल, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, एनबीसीसी, एनएमडीसी, रेल विकास निगम लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचाः सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद, गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले

सार्वजनिक उपक्रम विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. सध्या देशात १३ महारत्न कंपन्या आहेत. बुधवारी ‘ऑइल इंडिया’ला महारत्नाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ONGC Videsh ला नवरत्न दर्जा दिल्यानंतर देशात १४ नवरत्न कंपन्या (Navratna CPSE) झाल्या आहेत. मिनीरत्न I CPSE श्रेणीमध्ये एकूण ६२ कंपन्यांचा समावेश आहे. मिनीरत्न II CPSE यादीमध्ये एकूण ११ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Story img Loader