केंद्रातल्या मोदी सरकारने मंगळवारी ‘निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर माफी’ (रोडटेप) योजनेंतर्गत दिलेल्या निर्यात प्रोत्साहन लाभांचा कालावधी जून २०२४ पर्यंत वाढवला. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आलेले निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर सवलत योजना सहाय्य आता विद्यमान निर्यात वस्तूंसाठी समान दराने ३० जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे. हे आपल्या निर्यातदार समुदायाला सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात चांगल्या अटींवर निर्यात कराराच्या वाटाघाटी करण्यास मदत करेल. ही योजना जागतिक व्यापार संघटनेशी सुसंगत आहे आणि ती संपूर्णपणे माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे लागू केली जात आहे.

हेही वाचाः ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती ते दसऱ्यापर्यंत सुट्ट्याच सुट्ट्या, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

meta 213 crores fine
‘मेटा’ला २१३ कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाकडून कठोर शेऱ्यांसह आदेश
finance minister Nirmala Sitharaman
बँकांची कर्ज परवडणारी हवीत – सीतारामन
urban unemployment percentage marathi news
शहरी बेरोजगारीचा टक्का सप्टेंबर तिमाहीअखेर ६.४ टक्क्यांवर, तिमाहीगणिक ०.२ टक्क्यांनी घसरण
sbi marathi news
स्टेट बँक वर्षभरात आणखी ५०० शाखा सुरू करणार! सर्वात मोठ्या बँकेचे शाखाविस्तारात २३ हजारांचे लक्ष्य
banks administrative work
बँकांनी प्रशासकीय चौकट भक्कम करावी – दास; अनिष्ट पद्धतींना आळा घालण्याचे गव्हर्नरांचे आवाहन
bank of baroda stock market latest marathi news
धास्तावलेल्या शेअर गुंतवणूकदारांना दिलासा; वर्षभरात २०-२५ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक बाजारात परतेल
Direct tax collection marathi news
प्रत्यक्ष कर संकलन उद्दिष्टापेक्षा अधिक होईल, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांचा आशावाद
Today’s Gold Silver Price 18 November 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील आजचा दर
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास

आणखी एक घडामोड म्हणजे योजनेच्या चौकटीच्या अनुषंगाने विविध निर्यात क्षेत्रांसाठी निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजनेंतर्गत कमाल मर्यादा शुल्काचा आढावा घेण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी महसूल विभागात पुन्हा निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजना समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आज नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे निर्यात प्रोत्साहन परिषद (ईपीसी )/चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याशी पहिली चर्चा केली.

हेही वाचाः बायजू पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत, ४००० ते ५००० जणांना बसणार फटका

तसेच योजना आणि योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित कार्यपद्धती आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी निर्यात प्रोत्साहन परिषदने त्यांच्या निरीक्षणांमध्ये निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजनेची आर्थिक तरतूद वाढवण्याच्या आणि सर्व निर्यात वस्तूंना परदेशात अधिकाधिक बाजारपेठ मिळवण्यास मदत करण्यासाठी त्यांना उच्च दर उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर भर दिला.