केंद्रातल्या मोदी सरकारने मंगळवारी ‘निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर माफी’ (रोडटेप) योजनेंतर्गत दिलेल्या निर्यात प्रोत्साहन लाभांचा कालावधी जून २०२४ पर्यंत वाढवला. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आलेले निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर सवलत योजना सहाय्य आता विद्यमान निर्यात वस्तूंसाठी समान दराने ३० जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे. हे आपल्या निर्यातदार समुदायाला सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात चांगल्या अटींवर निर्यात कराराच्या वाटाघाटी करण्यास मदत करेल. ही योजना जागतिक व्यापार संघटनेशी सुसंगत आहे आणि ती संपूर्णपणे माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे लागू केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in