Ravi Ruia London Mansion : लंडन हे अनेक भारतीय अब्जाधीशांचे दुसरे घर असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लक्ष्मी निवास मित्तलपासून अनिल अग्रवालपर्यंतचे भारतीय अब्जाधीश आधीच लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. खरं तर लंडन हे भारतीय अब्जाधीशांचे फार पूर्वीपासून आवडते शहर आहे. आता भारतीय अब्जाधीश रवी रुईया यांचंही यात नाव जोडलं गेलं आहे. रवी रुईया यांनी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये नवे घर घेतले असून, लंडनमधील सर्वात महागडी मालमत्ता म्हणून ते ओळखले जाते. रवी रुईया यांनी हा करार ११३ मिलियन पौंड म्हणजेच १४५ मिलियन डॉलर्समध्ये केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला; घसरणीमागील प्रमुख कारण काय?

रुईया यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे नाव हॅनोवर लॉज असून, ते लंडनच्या रिजेंट पार्कमध्ये आहे. इंटिरियर डिझायनर्स डार्क आणि टेलर यांच्या मते, हॅनोव्हर लॉज ही लंडनमधील सर्वात महागडी खासगी निवासी मालमत्ता आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेली ही मालमत्ता आहे, ज्याची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद जॉन नॅश यांनी केली होती. रुईया यांच्याआधी हे घर रशियन अब्जाधीश आंद्रेई गोंचारेन्को यांच्या मालकीचे होते. आंद्रेई गोंचारेन्को हे रशियाच्या सरकारी तेल गॅस कंपनी गॅझप्रॉमची उपकंपनी असलेल्या गॅझप्रॉम इन्व्हेस्ट युगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी ही मालमत्ता २०१२ मध्ये राजकुमार बागरी यांच्याकडून १२० दशलक्ष डॉलरला विकत घेतली होती.

हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी घसरण, श्रीमंतांच्या यादीत अंबानी अन् अदाणींचे स्थान काय?

रवी रुईया यांनी रुईया फॅमिली ऑफिसच्या माध्यमातून ही मालमत्ता खरेदी केली आहे. रुईया फॅमिली ऑफिसचे प्रवक्ते विल्यम रिगो यांनी ईमेलद्वारे याला दुजोरा दिला आहे. शतकानुशतके जुन्या हवेलीचे बांधकाम अजूनही तसेच सुरू आहे. यामुळे लक्झरी मालमत्ता तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होती, ज्यामुळे रुईयासाठी एक आकर्षक डील बनली, असंही प्रवक्त्याचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The most expensive house london mansion bought by ravi ruia indian in london vrd