UPI Transaction in October 2023 : भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. यामध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची मोठी भूमिका आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरात १ हजार कोटींहून अधिक UPI व्यवहारांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा सलग तिसरा महिना आहे, जेव्हा UPI व्यवहारांची संख्या १ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये युजर्सनी एकूण १,४१४ कोटी व्यवहारांद्वारे एकमेकांना १७.१६ लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
हेही वाचाः विश्लेषण : आयडीबीआय बँकेकडून मुंबई मेट्रो वनला दिवाळखोरी प्रकरणात कोर्टात खेचण्याचे कारण काय?
सलग तीन महिने १ हजार कोटींहून अधिक व्यवहार झालेत
ऑक्टोबरमध्ये UPI च्या वापरामध्ये वार्षिक ५५ टक्के आणि व्यवहाराच्या रकमेमध्ये ४२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. सप्टेंबर २०२३ च्या डेटाबद्दल बोलायचे झाल्यास युजर्सनी UPI द्वारे १०५६ कोटी व्यवहार करून १५.८० लाख कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. तर ऑगस्टमध्ये १०५८ कोटी व्यवहारांद्वारे एकूण १५.७६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
UPI ट्रेंड दिवसागणिक वाढताच
२०१६ मध्ये लाँच झालेल्या UPI चा ट्रेंड भारतात झपाट्याने वाढत आहे. आजकाल लोक रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंट करण्याला प्राधान्य देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या हंगामामुळे नोव्हेंबरमध्ये UPI व्यवहारांमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. NPCI डेटानुसार, ऑक्टोबरमध्ये IMPS द्वारे ४९.३ कोटी व्यवहारांद्वारे ५.३८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. अशा परिस्थितीत रकमेच्या बाबतीत १५ टक्के आणि व्यवहारांच्या बाबतीत २ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.