देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत बंपर नफा कमावला आहे. या दरम्यान बँकेने ३० टक्के निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत HDFC बँकेचा नफा ११,९५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जे मागील तिमाहीत ९,१९६ कोटी रुपये होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचडीएफसी बँकेच्या नफ्यात केवळ विक्रमी वाढच होत नाहीये. त्याऐवजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर ती जगातील सातवी सर्वात मोठी बँक बनली आहे. एचडीएफसी बँकेच्या निकालांमध्ये बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या कालावधीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न २१.१ टक्क्यांनी वाढून २३,५९९ कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

हेही वाचाः Money Mantra : पीपीएफ अन् इक्विटी! दीर्घकालीन फायद्यासाठी कोणती योजना चांगली? गणित समजून घ्या

बाजारमूल्यही विक्रमी पातळीवर

एचडीएफसी बँकेच्या त्रैमासिक निकालापूर्वी विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक जगातील सातवी सर्वात मोठी बँक बनली आहे. खरं तर नवीन स्टॉकच्या सूचीनंतर HDFC बँकेचे बाजार मूल्य १२.४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. विलीनीकरणानंतर १७ जुलै रोजी एचडीएफसी बँकेचे ३११ कोटी रुपयांचे समभाग शेअर बाजारात सूचीबद्ध झाले.

हेही वाचाः मे महिन्यात क्रेडिट कार्डांवर १.४ लाख कोटी रुपये खर्च; बनला नवा रेकॉर्ड

आता काय बदलेल?

विलीनीकरणानंतर भागधारकांना नवीन पॅटर्नमध्ये एचडीएफसीच्या प्रत्येक २५ शेअर्समागे ४२ शेअर्स मिळतील. आजपासून या शेअर्सचा व्यवहार बाजारात सुरू झाला आहे. या बदलानंतर आता एचडीएफसी बँकेने मॉर्गन स्टॅनले, चायना कन्स्ट्रक्शन बँक, बँक ऑफ चायना यांसारख्या जागतिक दिग्गजांना मागे टाकले आहे. संपूर्ण जगाबद्दल बोलायचे झाल्यास एचडीएफसी बँक आता थेट जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, अॅग्रिकल्चर बँक ऑफ चायना या दिग्गजांशी स्पर्धा करेल. बाजारमूल्याच्‍या दृष्‍टीने HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक आहे. तर सरकारी क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया ही नावाजलेली बँक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The profit of the country largest hdfc bank reached 11952 crores you will also benefit like this vrd