केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत होणाऱ्या नोंदणीने आज सहा कोटींचा टप्पा पार केला आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत ७९ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेअंतर्गत समाजातील सर्वात दुर्बल घटकांना निवृत्तीवेतनाच्या परिघात आणण्याचा सरकारचा प्रयत्न हा बँकांच्या अथक परिश्रमांमुळे यशस्वी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असून, ९ मे २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा प्रारंभ केला आणि देशातील वयोवृद्ध नागरिकांना उत्पन्न सुरक्षा मिळण्याची व्यवस्था केली. विशेषतः गरीब, उपेक्षित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांवर या योजनेत भर देण्यात आला आहे.

हेही वाचाः प्रधानमंत्री जन धन योजनेतील ५१.०४ कोटी खात्यांमध्‍ये २ लाख कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा

दरमहा ५ हजार रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन कसे मिळणार?

१८ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांना अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी ५ हजार रुपये पेन्शन मिळवायची असेल तर वयाच्या १८ व्या वर्षी प्रत्येक महिन्याला २१० रुपये गुंतवा. जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा सुमारे १४५४ रुपये द्यावे लागतील. यावर तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी ५ हजार रुपये पेन्शन मिळेल.

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) अलीकडच्या काळात या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यात हिंदी, इंग्रजी आणि २१ प्रादेशिक भाषांमध्ये या योजनेची माहिती देणारे, एका पानाचे पत्रक/हस्तपत्रक प्रकाशित करणे समाविष्ट आहे.

हेही वाचाः प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत मागील पाच आर्थिक वर्षांत २८.८९ कोटींहून अधिक कर्जदारांना १७.७७ लाख कोटींचे वितरण

अटल पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहक तिहेरी लाभ मिळवण्यास पात्र ठरतो. त्यानुसार ६० वर्षे वयानंतर १ हजार ते ५ हजार रुपये प्रतिमहिना रुपये निवृत्तीवेतन आजीवन मिळू शकेल. त्यांचे योगदान आणि योजनेचा लाभ घेताना त्यांचे वय यानुसार, निवृत्तीवेतनाचा आकडा बदलू शकतो. लाभार्थी सदस्याचा मृत्यू झाल्यास निवृत्तीवेतन त्यांच्या जोडीदाराला दिले जाईल आणि सदस्य आणि जोडीदार दोघांच्या मृत्यूनंतर सदस्यांच्या वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत जमा झालेली निवृत्तीवेतनाची संपत्ती त्यांनी नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाणार आहे.

योजनेत गुंतवणूक कशी करावी?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करा. तिथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये नाव, आधार, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील इत्यादी सर्व कागदपत्रे भरून सबमिट करावी लागतील. यानंतर फॉर्म बँकेत जमा करा. केवायसी तपशील दिल्यानंतर तुम्ही अटल पेन्शन खाते उघडू शकाल

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The registration of atal pension yojana has crossed the six crore mark vrd